Dainik Maval News : मावळ तालुक्यातील २४ शाळा लवकरच आधुनिक पायाभूत सुविधांनी सुसज्ज ‘पुणे मॉडेल स्कूल’ (आदर्श शाळा) म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून हा महत्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात येत असून, त्यासाठी एकूण २० कोटी ५७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिली.
- या २४ शाळांमध्ये नवीन वर्गखोल्या, प्रवेशद्वार, व्यासपीठ, पदपथ, हॅंडवॉश स्टेशन, शौचालये आणि संरक्षक भिंती अशा आधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत.
मावळ तालुक्यातील आदर्श शाळांची यादी व निधी (रु. लक्षात)
१) आढले बु – ९१.२१
२) शिवणे – १०९.२२
३) उर्से – ७७.०५
४) ताजे – ४८.९०
५) भोयरे – १५९.५९
६) तुंग – ५६.७१
७) सांगवडे – ९१.५०
८) गोवित्री – ४९.३३
९) वराळे – १००.०४
१०) येलघोल – १९७.६१
११) महागाव – १०.७७
१२) नाणे – ८६.५०
१३) साते – ५५.४४
१४) नायगाव – ५९.६६
१५) खांडी – ८३.१७
१६) कुसगाव – ७७.४४
१७) माळेगाव खु. – ७९.८९
१८) नवलाख उंबरे – ६६.१८
१९) बुधवडी – १२२.२३
२०) इंदोरी – १५०.२३
२१) टाकवे – १४४.४०
२२) कुसवली – ८५.५६
२३) वारु – ४०.४१
२४) शिलाटणे – १६७.००
या ऐतिहासिक शालेय विकास प्रकल्पामुळे मावळ तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागात शिक्षण क्षेत्रात मोठी गुणवत्ता वाढ होणार आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सुरक्षित शिक्षण मिळण्यासाठी ही पायाभूत कामे अत्यंत महत्वाची ठरणार आहेत.
- आमदार सुनील शेळके म्हणाले, “ही केवळ शाळांची डागडुजी नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी साकारलेला एक शासकीय व सामाजिक संकल्प आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार! ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मी स्वतः लक्ष ठेवणार आहे.”
या २४ शाळांच्या कामांसाठी आवश्यक निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, कार्यकारी अभियंत्यांच्या देखरेखीखाली सर्व कामे नियमानुसार वेळेत पूर्ण करण्यात येणार आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जून महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– जिल्हाधिकाऱ्यांकडून मावळच्या सर्वांगीण विकासाला गती ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक
– पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील 15 ‘ब्लॅक स्पॉट’ची दुरुस्ती । Pune Mumbai Highway