व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील 15 ‘ब्लॅक स्पॉट’ची दुरुस्ती । Pune Mumbai Highway

त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण घटले आहे, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता राहुल वसईकर यांनी दिली

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 30, 2025
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
old Mumbai Pune highway

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पावसाळ्याच्या दिवसांत होणारे अपघात टाळण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील 15 अपघातप्रवण स्थळांची (ब्लॅक स्पॉट) दुरूस्ती केली. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण घटले आहे, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता राहुल वसईकर यांनी दिली.

  • जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचे (राष्ट्रीय महामार्ग 48) काही भाग अपघातप्रवण म्हणून ओखळले जातात. त्यावर महामंडळाने सेव्ह लाइफ फाउंडेशनच्या मदतीने विविध उपाययोजना सुचविल्या. 15 अपघातप्रवण स्थळांची (ब्लॅक स्पॉट) पडताळणी करून आकडेवारीच्या आधारे आणि अभियांत्रिकी उपायांतून तोडगा काढण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील अपघातांचे प्रमाण कमी होऊन मृत्यूमुखी पडणार्‍यांच्या संख्येत घट झाली आहे.

सोमाटणे फाटा येथील टोल नाक्याजवळील लडकत पेट्रोल पंपापासून महानगर गॅस लिमिटेड कंपनीपर्यंत असलेल्या भागातील 15 अपघातप्रवण स्थळांचा यामध्ये समावेश आहे. त्यातही प्रामुख्याने वडगाव फाटा, कामशेत घाट परिसर, शिलाटणे फाटा आणि खालापूर भागाचा समावेश आहे. या भागातील दुरुस्तीमध्ये कमी दृश्यमानता, पादचार्‍यांना असणारा धोका, वेगाने येणार्‍या वाहनांसाठी गतिरोधक, यांवर काम केले गेले.

तसेच, या ठिकाणी मध्यवर्ती बंदिस्त भिंत अर्थात डिव्हायडरचा वापर, वेग कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त असुरक्षित पद्धतीने वाहने चालविणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी कॅमेर्‍यांचा वापर होत आहे.

या महामार्गावर 2018 मध्ये 269 मृत्यू झाले होते. हे प्रमाण 2014 मध्ये 67 टक्क्यांनी कमी होऊन 88 मृत्यू झाले, तर 2025 च्या पहिल्या तिमाहीत केवळ 6 मृत्यू झाले आहेत. 2024 च्या पहिल्या तिमाहीत ही संख्या 24 होती. मागील वर्षी याच भागात वेगवेगळ्या अपघातांत सुमारे 88 जणांचा मृत्यू झाला होता.

अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. महामंडळाच्या अन्य मार्गांवरही अशाच उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. – राहुल वसईकर, मुख्य अभियंता, एसएसआरडीसी, पुणे

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा, चिखलमय रस्त्यांची डागडुजी करा ; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! कृषी सहाय्यकांचा संप मिटला, सरकारकडून बहुतांश मागण्या मान्य, आजपासून पुन्हा कर्तव्यावर
– मावळ तालुक्यात कृषी प्रकल्प राबविण्यासाठी आमदार शेळकेंचा पुढाकार ; मंत्रालयातील बैठकीत मावळच्या प्रकल्पांसाठी विशेष मागणी


Previous Post

कामशेत शहरातील आठवडे बाजारात होणाऱ्या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी – वाचा संपूर्ण प्रकरण

Next Post

फ्रेंड्स ऑफ नेचर असोसिएशनचा वर्धापन दिन उत्साहात ; विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा केला गौरव । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Friends of Nature Association celebrates its anniversary with enthusiasm Talegaon Dabhade

फ्रेंड्स ऑफ नेचर असोसिएशनचा वर्धापन दिन उत्साहात ; विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा केला गौरव । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.