पुण्यातील ( Pune ) कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे ( Goon Gaja Marne ) याला पुणे पोलिसांनी ( Pune Police ) अटक केली आहे. सातारा जिल्ह्यातील वाईजवळील एका फॉर्महाऊसवरून पोलिसांनी गजा मारणे याला बेड्या ठोकल्या आहेत. मागील अनेक महिन्यांपासून पुणे पोलीस गजा मारणेच्या मागावर होते. अखेर आज (रविवार, 16 ऑक्टोबर) गजा मारणेला गजाआड करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. ( Goon Gajanan Gaja Marne Taken To Custody By Pune Police From Satara Wai )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याला सातारा जिल्ह्यातील वाई येथील एका फार्महाऊसमधून ताब्यात घेतले आहे. हा फार्महाऊस एड. विजय ठोंबरे यांचा असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गजा मारणे याठिकाणी आपल्या वकिलाला भेटण्यास आला होता. दरम्यान, पुणे पोलिसांनी फार्महाऊसवर छापेमारी करत त्याला अटक केली आहे.
गजानन मारणे याला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे आणि कर्मचार्यांनी ताब्यात घेतले आहे.
अधिक वाचा –
पुणे-लोणावळा मार्गावरील कासारवाडीतील रेल्वे फाटक पाच दिवस बंद, वाचा सविस्तर
पाथरगाव इथे आदिवासी बांधवाच्या घरात घुसलेल्या 14 फुटी अजगराला सर्पमित्रांकडून जीवदान, पाहा व्हिडिओ