मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळामध्ये संघटक पदी प्राध्यापक हभप गोपीचंद महाराज कचरे यांची निवड करण्यात आली. नियुक्ती जाहीर जाल्याची माहिती टाकवे बुद्रुक इथे मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार भसे यांनी दिले. तिथे मान्यवरांनी गोपीचंद कचरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्रा गोपीचंद कचरे हे मावळ तालुक्यातील एक अभ्यास हुशार व्यक्तिमत्व असून वारकरी सांप्रदायांमध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. ते स्वतः प्रवचनकार, कीर्तनकार, प्राध्यापक असून मावळ तालुक्यातील विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक योगदान देत असतात. त्यांची नियुक्ती झाल्याने त्यांना फोन, मेसेजद्वारे वारकरी बंधू-भगिनी शुभेच्छा देत आहेत. ( gopichand kachare selected as organizer of maval taluka warkari sampradaya mandal )
या वेळी मंडाळाचे कार्याध्यक्ष संतोष कुभांर, प्रवक्ते सुनिल महाराज वरघरे, आरोग्य समिती प्रमुख राजाराम असवले, सचिव रामदास पडवळ, सचिव नितिन आडीवळे, विभाग प्रमुख दिपक वारींगे, सल्लागार सागर शेटे, महादू नवघणे आदी सांप्रदायिक मंडळी उपस्थितीत होते.
अधिक वाचा –
– शरद पवार यांची मोठी घोषणा! सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष; अजित पवारांसमोरच घोषणा
– महत्वाची बातमी! श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत मोठा बदल, लगेच वाचा