वडगांव मावळ येथे दि ७ ते १० मार्च दरम्यान राजे शिव छत्रपती जयंती महोत्सवाची सांगता मोठ्या थाटामाटात आणि विविध कार्यक्रमांनी झाली. या महोत्सवाचे हे ४४ वे वर्ष होते. ( Gouritai Sangle Keertan at Vadgaon Maval For Raje Shiv Chhatrapati Jayanti 2023 )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मंगळवार दिनांक ७ मार्च रोजी राष्ट्रीय कीर्तनकार हभप गौरीताई सांगळे यांची कीर्तनरुपी सेवा संपन्न झाली. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा यावेळी विशद करण्यात आली. “क वर्ग” तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झाल्याबद्दल श्री पोटोबा देवस्थान संस्थान, सर्व विश्वस्त यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, उपाध्यक्ष गणेश आप्पा ढोरे, सचिव अनंता कुडे, खजिनदार चंद्रकांत ढोरे, किरण भिलारे, ऍड.अशोकराव ढमाले, ऍड. तुकाराम काटे, सुनिता कुडे आदींनी सन्मान स्वीकारला. माजी सभापती निवृत्ती शेटे, ज्येष्ठ नेते सोपानराव ढोरे, हभप नंदकुमार भसे, पुणे जिल्हा कुंभार समाजाचे अध्यक्ष संतोष कुंभार उपस्थित होते. आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर महाप्रसाद व्यवस्था करण्यात आली होती.
अधिक वाचा –
– छत्रपती शिवरायांचा 393वा शिवजन्मोत्सव सोहळा वडगाव इथे थाटामाटात संपन्न, पुरस्कार्थ्यांना पुरस्कार प्रदान । Vadgaon Maval
– राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव निमित्त वडगावात जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा, पाहा विजेत्यांची यादी । Vadgaon Maval