वडगांव मावळ येथे दि ७ ते १० मार्च दरम्यान राजे शिव छत्रपती जयंती महोत्सवाची सांगता मोठ्या थाटामाटात आणि विविध कार्यक्रमांनी झाली. या महोत्सवाचे हे ४४ वे वर्ष होते. ( Pune District Level Bodybuilding Competition Results Raje Shiv Chhatrapati Jayanti 2023 Celebrated In Vadgaon City Of Maval Taluka )
गुरुवार दिनांक 9 मार्च रोजी छत्रपती श्री २०२३ ही जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे, पै संभाजीराव राक्षे, महाराष्ट्र भीम पै केतन करंडे, महाराष्ट्र केसरी पै शिवराज राक्षे, माजी उपसभापती शांताराम कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या प्रसंगी बाळा भेगडे आणि गणेश भेगडे यांनी आपल्या मनोगतात खेळाडूंना शुभेच्छा दिल्या तसेच तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
छत्रपती श्री २०२३ विजेते खालीलप्रमाणे
छत्रपती श्री २०२३- पवन थोरात
बेस्ट पोझर – आदेश ढोरे
मोस्ट इंप्रुव्हड – करन जांभळे
अपकमिंग स्टार – आवेज शेख
माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक बिहारीलाल दुबे, सुधीर म्हाळसकर, सुनील चव्हाण, राजेंद्र वहिले, मिलिंद चव्हाण, नारायणराव ढोरे, उपनगराध्यक्ष सायली म्हाळसकर, नगरसेवक प्रवीण चव्हाण, किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, खंडूशेठ भिलारे, राजेंद्र कुडे, मंगेश खैरे, मा नगरसेवक ऍड.विजयराव जाधव, प्रसाद पिंगळे, रवींद्र काकडे, शंकर भोंडवे, मा सरपंच संभाजीराव म्हाळसकर, नितीन कुडे, पत्रकार सुदेश गिरमे, मावळ तालुका मनसे अध्यक्ष रुपेश म्हाळसकर, पवना सह पतसंस्था चेअरमन विठ्ठलराव घारे, वडगांव सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत ढोरे, मा.ग्रा. पं. सदस्य भरत म्हाळसकर, व्हा.चेअरमन पंढरीनाथ भिलारे, मा सरपंच नामदेव भसे आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– वडगावात शिवजयंतीनिमित्त महिलांसाठी ‘खेळ रंगला पैठणीचा’, संध्या पोले यांनी जिंकली मानाची पैठणी । Vadgaon Maval
– वडगावात शिवजयंतीनिमित्त हभप गौरीताई सांगळे यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न, हजारो श्रोत्यांनी घेतला कीर्तनसेवेचा लाभ । Vadgaon Maval