व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे येथे शिक्षण घेणाऱ्या तरूण तरूणीचा लोणावळा जवळील शिरोता धरणामध्ये बुडून मृत्यू

घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलीस, ‘वन्यजीव रक्षक मावळ संस्था आपत्ती व्यवस्थापन टीम’ तसेच ‘शिवदुर्ग मित्र लोणावळा’ यांचे रेस्क्यू पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 18, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
young Girl and Boy studying in Pune drowned in Shirota Dam near Lonavala Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पर्यटन नगरी लोणावळा शहराजवळ असलेल्या शिरोता डॅम (धरण) परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी (दि. १७ मे) रोजी सुट्टी असल्याने पर्यटनासाठी आलेल्या मित्रांच्या ग्रुपमधील तरुण व तरुणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. करण ज्ञानदेव ठोंबरे (वय २०, रा. बालाजीविहार, कोडोली, सातारा) आणि कु. आर्या सुशांत बंडावार (वय २०, मूळ रा. गोंदिया) अशी मृत पावलेल्या दोघांची नावे असून दोघे विद्यार्थी असून पुणे परिसरात शिक्षण घेत होते.

याप्रकरणी सुसगाव (ता. मुळशी, जि. पुणे, मूळ रा. कोलबले, जवळ हॉटेल पाटीलवाडा, धुळे) येथे राहणारा आणि ISBM कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिकणारा मृत विद्यार्थ्यांचा मित्र कु. सुजल प्रकाश पवार (वय १९, व्यवसाय: शिक्षण) याने कामशेत पोलीस ठाण्यात अधिकृत खबर दिली आहे.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.१७) सकाळी ७:०० वा. सुमारास सुजल हा त्याचा मित्र करण ठोंबरे, आर्या बंडावार, आस्था टेंबरे, सृष्टी गवाडे आणि ज्योत्सना शेळके अशा ६ जणांच्या ग्रुपसह राजमाची किल्ला येथे फिरण्यासाठी दोन दुचाकी आणि दोन स्कूटीवरून निघाले होते. राजमाची जवळ पोहोचल्यानंतर सर्वांच्या संमतीने गडावर न जाता ‘शिरोता डॅम’ (शिरदे डॅम) येथे फिरण्याचा बेत ठरला.

दुपारी १२:०० वा. सुमारास हे सर्वजण डॅमच्या बॅकवॉटर परिसरात पोहोचले आणि पाण्यात पाय सोडून गप्पा मारत बसले. दरम्यान पाण्याचे गाळ आणि गढूळ स्वरूप पाहून आर्या आणि ज्योत्सना या दोघी “येथे गढूळ पाणी आहे, आपण पुढे जाऊ” असे म्हणत पुढे गेल्या. काही वेळातच दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास ज्योत्सनाचा “वाचवा… वाचवा…” असा ओरडण्याचा आवाज आला. हे पाहताच करण ठोंबरे तिला वाचवण्यासाठी धावला आणि त्याच्या पाठीमागे सुजल देखील पळाला.

ज्योत्सना ही पाण्यात बुडणाऱ्या आर्याला वाचवण्यासाठी हात ओढण्याचा प्रयत्न करत होती, परंतु तिचा हात पोहोचत नव्हता. तितक्यात करणने पाण्यात उडी मारली, मात्र करणला देखील पोहता येत नसल्याने आर्या व करण हे दोघेही पाण्यात बुडू लागले आणि स्वतःला वाचवण्यासाठी हातवारे करू लागले. सुजलनेही पाण्यात उडी मारून त्यांना वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, तसेच तिथे आलेल्या इतर पर्यटकांनीही मदतीचा प्रयत्न केला, मात्र दुर्दैवाने आर्या आणि करण हे दोघेही खोल पाण्यात बुडाले.

यानंतर मित्रांनी तात्काळ ‘डायल १००’ वर कॉल करून पोलिसांची मदत मागवली. घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलीस, ‘वन्यजीव रक्षक मावळ संस्था आपत्ती व्यवस्थापन टीम’ तसेच ‘शिवदुर्ग मित्र लोणावळा’ यांचे रेस्क्यू पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या मदतीने युद्धपातळीवर शोधमोहीम राबवून दोघांना पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यानंतर तातडीने रुग्णवाहिकेतून (ॲम्बुलन्स) त्यांना कामशेत येथील महावीर हॉस्पिटल येथे नेण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच म्हणजेच दुपारी ०५:१५ वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना तपासून ‘मयत’ घोषित केले.

या मदतकार्यात वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि शिवदुर्ग मित्र लोणावळाच्या जवानांसह (निलेश गराडे, महेश मसने, भास्कर माळी, अमोल सुतार, विनय सावंत, कुणाल कडू, गणेश गायकवाड, राजेंद्र कडू, कुंदन भोसले, सागर लोकरे, अनिश गराडे, अभिजित बोरकर, सतिष सगर, नितीन सांगडे, सुनील गायकवाड) उधेवाडी गावचे लक्ष्मण गायकवाड आणि DATA टीम डेला यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कामशेत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी आकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार पो. हवा. हिप्परकर यांनी घटनेची नोंद केली असून, पुढील तपास तपासी अंमलदार पो. हवा. लबडे करत आहेत.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) अनुषंगाने वडगाव मावळ येथे प्रशिक्षण शिबिर संपन्न
– मावळमधील महत्वाच्या विकासकामांबाबत आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून पीएमआरडीए कार्यालयात विशेष बैठक संपन्न
– पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती ; जिल्हा वार्षिक योजनेसाठी १४७२ कोटींची तरतूद, गतवर्षीपेक्षा ९३ कोटींची वाढ
– पालकांनो, पाल्याचा शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी ही बातमी वाचा ! पुणे जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील ४५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर


dainik maval jahirat

Previous Post

पुणे जिल्ह्यात घरसुचीकरण व गृहगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास वडगावकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विविध दाखल्यांचे वाटप

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Spontaneous response of Vadgaonkar citizens to Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Camp

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास वडगावकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विविध दाखल्यांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Development of Kondeshwar pilgrimage site to gain momentum MLA Sunil Shelke conducts an on-site inspection

कोंडेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासाला मिळणार गती ; भाविक-पर्यटकांच्या सुविधांसाठी आमदार सुनील शेळके यांची प्रत्यक्ष पाहणी

August 19, 2026
Clarify timeline for Pune-Lonavala third fourth railway lines MP Shrirang Barne directs railway administration

पुणे-लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेची कालमर्यादा स्पष्ट करा ; शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे प्रशासनाला सूचना

August 19, 2026
Talegaon Dabhade Momentum gathers for development of Baneshwar Crematorium through MLA Sunil Shelke

तळेगाव दाभाडे : बनेश्वर स्मशानभूमीच्या विकासाला गती ; नागरिकांच्या मूलभूत सुविधांना आमदार सुनील शेळके यांचे प्राधान्य

August 19, 2026
Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.