महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्ह्य क्रीडा अधिकारी रायगड यांच्या वतीने राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा 2022-23 चे भव्य अयोजन खोपोली येथे नियोजित कुस्तीमहर्षी भाऊसाहेब कुंभार क्रीडा नगरी समर्थ मंगल कार्यालय – खोपोली येथे 13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान संपन्न होणार आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत 14 व 17 वर्ष वयोगटातील महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, लातूर या आठ विभागतील महिला खेळाडू सहभाग घेऊन मॅटवर आपल्या कुस्तीतील डावपेचांचे प्रदर्शन करणार आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या भव्य स्पर्धेचे उदघाटन कर्जत – खलापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते होणार आहे, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे हे भूषवणार आहेत. या आयोजनात माजी ऑलम्पियन मारुती आडकर, अर्जुन पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू नरसिंह यादव, जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक, कर्जतचे प्रांताधिकारी अजित नैराळे, खालापुरचे तहसीलदार आयुब तांबोळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनुप दुरे, खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार, खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाळा कुंभार, खालापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटील व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल, भगतसिंह कोश्यारी पायउतार, रमेश बैस असणार नवे राज्यपाल, वाचा अधिक
– मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करण्याचा प्लॅन करताय? ही बातमी नक्की वाचा