मावळ तालुक्यामधील बऊर गावामध्ये शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रम घेण्यात आला होता. तळेगाव दाभाडे येथील हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्था आणि सहासंखा (CSR) प्रकल्पाअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. ( Government Schemes Awareness Program In Baur Village of Maval Taluka By Hand in Hand India NGO Talegaon Dabhade )
शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रमाचा उद्देश हा ग्रामीण भागातील गरजू लोकांना केंद्र व राज्य शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांबाबत जनजागृती करून लाभार्थ्यांपर्यंत आवश्यक कागदपत्रे, तसेच अर्ज करण्याचे सरकारी ठिकाण या गोष्टींची जाणीव आणि पात्र लाभार्थ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रमात आकाश लालगुडे, परमेश्वर कांबळे, अक्षदा लालगुडे आणि सोनम राणे यांनी शासकीय योजनांबद्दल माहिती दिली. यावेळी बऊर गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, जि. प. शाळा शिक्षिका, बचत गट सी.आर.पी. आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रमास हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेकडून परमेश्वर कांबळे, ओमकार कुलकर्णी, मोहन सोनवणे, अक्षदा लालगुडे, सोनम राणे आणि अक्षय लालगुडे इत्यादी संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. परमेश्वर कांबळे यांनी शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रमास सहभागी ग्रामस्थांचे, गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व संस्थेचे यांचे आभार मानले.
अधिक वाचा –
– शिवसम्राट प्रतिष्ठान वर्धापन दिन आणि स्व. भाऊ लायगुडे यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर; उद्घाटक सुधाकर शेळकेंचेही रक्तदान
– मावळ तालुका हादरला! मावस भावाकडून अल्पवयीन बहिणीचे लैंगिक शोषण, गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघडकीस