राज्यातील विविध जिल्ह्यांतील एकूण 7751 ग्रामपंचायतींकरिता निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. यात मावळ तालुक्यातील 9 ग्रामपंचायतींच्या 83 जागांसाठी 219 उमेदवारांचे एकूण 225 अर्ज आले. तर, सरपंच पदासाठी 51 उमेदवारी अर्ज दाखल झाले, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे आणि नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली. ( Gram Panchayat Election 2022 225 Nominations For 9 GramPanchayat In Maval Taluka 51 Applications For Sarpanch Post )
मावळ तालुक्यातील सध्या होत असलेल्या नऊ ग्रामपंचायतींमध्ये इंदोरी, सावळा, देवले, भोयरे, शिरगाव, वरसोली, कुणे नामा, निगडे आणि गोडुंब्रे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम पत्रिकेनुसार दिनांक 18 डिसेंबर रोजी होणार आहे. शुक्रवारपर्यंत भरलेल्या उमेदवारी अर्जांची सोमवार 5 डिसेंबर रोजी छाननी होणार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
1. इंदोरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 5 तर 6 प्रभागातील 17 जागांसाठी 38 अर्ज आले आहेत.
2. निगडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 5 तर 3 प्रभागातील 9 जागांसाठी 37 अर्ज आले आहेत.
3. भोयरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 4 तर 3 प्रभागातील 7 जागांसाठी 17 अर्ज आले आहेत.
4. सावळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 5 तर 3 प्रभागातील 7 जागांसाठी 11 अर्ज आले आहेत.
5. शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 11 तर 3 प्रभागातील 9 जागांसाठी 42 अर्ज आले आहेत.
6. गोडुंब्रे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 5 तर 3 प्रभागातील 9 जागांसाठी 14 अर्ज आले आहेत.
7. वरसोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 3 तर 3 प्रभागातील 9 जागांसाठी 21 अर्ज आले आहेत.
8. देवले ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 6 तर 3 प्रभागातील 7 जागांसाठी 18 अर्ज आले आहेत.
9. कुणे नामा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 7 तर 3 प्रभागातील 9 जागांसाठी 27 अर्ज आले आहेत.
( Gram Panchayat Election 2022 225 Nominations For 9 GramPanchayat In Maval Taluka 51 Applications For Sarpanch Post )
अधिक वाचा –
– ग्रामपंचायत निवडणूक : 23 डिसेंबरपर्यंत जवळ शस्त्र बाळगण्यास मनाई, कलम 144 लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, वाचा
– पंधरावा वित्त आयोग : ग्रामपंचायती होणार मालामाल, पाहा पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्याला किती निधी मिळणार?
– गाव तसं चांगलंच..! सरपंच पदाच्या निवडणूकीत 1 मताने हरला उमेदवार; गावाने 11 लाख, 1 कार आणि जमीन देऊन केला सत्कार