मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त श्री विठ्ठल परिवार मावळ आणि मोरया महिला प्रतिष्ठान वडगाव आयोजित तालुकास्तरीय भजन स्पर्धेचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते शंकरराव शेळके आणि मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून संपन्न झाला. शुक्रवारी (दि. 27 ऑक्टोबर) रोजी या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुक्यातील सुमारे दिडशेहून अधिक भजनी मंडळांनी या भजन स्पर्धेत सहभाग घेतला आहे. अतिशय भक्तिमय वातावरणात या भजन स्पर्धेस सुरुवात झाली असून या स्पर्धा सलग तीन दिवस चालू असणार आहेत. यावेळी शंकरराव शेळके, हभप शंकरराव मराठे, मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे, नगरसेविका पुनम जाधव, हभप गणेश महाराज जांभळे, हभप नितीन काकडे, महेंद्र ढोरे, दिलीप खेंगरे, दत्ता केदारी, नारायण ठाकर, लक्ष्मण सातकर, प्रकाश जाधव, मुकूंद राऊत,बाळू आडकर, बाबाजी बालगुडे, बाळासाहेब जांभूळकर, रुपाली नाणेकर परिक्षक राधाकृष्ण गरड, गणेश मोहिते, अजित लोहार आणि मोरया महिला प्रतिष्ठानच्या संचालिका तसेच वारकरी संप्रदायातील भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपला महाराष्ट्र ही साधु संतांची भूमी म्हणून ओळखली जाते.सर्व संतांनी आपल्या अभंगातून समाजाला एक नवी दिशा दिली. हा असा एकोपा, प्रेम, स्वयंशिस्त, भक्तीभाव आपल्याला अशा भजन स्पर्धांमधून पहायला व शिकायला मिळते. असा हा भक्तिमार्गाचा वारसा जतन करण्याचे व तो पुढे नेण्याचे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे असा विश्वास मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांनी व्यक्त केला. ( Grand bhajan competition at Vadgaon Maval on occasion of MLA Sunil Shelke birthday )
अधिक वाचा –
– तळेगावमधील ‘म्हाडा’ सदनिकाधारकांच्या विविध समस्यांबाबत पुण्यात संयुक्त बैठक; ‘या’ तारखेपर्यंत सर्वांना घराचे ताबे मिळणार
– महत्वाची बातमी! ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू, वाचा काय आहे आदेश?
– दिवड गावात भाजपाला खिंडार; आमदार शेळकेंच्या उपस्थितीत अनेक दिग्गजांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश