मावळ तालुक्यातील आदर्श प्राथमिक शाळा असलेली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंदनवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना बुधवारी (दि. 25 ऑक्टो.) शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. इंटरनॅशनल मॅनेजमेंट स्कूल हिंजवडी येथील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या मार्फच चंदनवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले गेले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शैक्षणिक साहित्यात पेन, पेन्सिल, खोडरबर, वह्या अशा दररोजच्या उपयोगाचे शालेय साहित्य होते. तसेच, विद्यार्थ्यांना करियर विषयक मार्गदर्शन करून शिक्षणासाठी प्रेरणा देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रथम देवरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती अर्चना शिरसाठ यांनी केले, तसेच सर्व टीमचे स्वागत व आभार शाळेचे मुख्याध्यापक विकास रासकर यांनी मानले. ( Educational materials distributed to students of Chandanwadi school in Maval taluka )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू, वाचा काय आहे आदेश?
– दिवड गावात भाजपाला खिंडार; आमदार शेळकेंच्या उपस्थितीत अनेक दिग्गजांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश
– लोणावळा शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विशाल पाडाळे; नवनियुक्त अध्यक्षांकडून नूतन कार्यकारिणी जाहीर, वाचा सविस्तर