जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत सिंचनभवन पुणे येथे गुरुवारी (दि. 26 ऑक्टो.) आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला आमदार सुनिल शेळके यांच्या समवेत मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता जगताप, कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे, राजू डोबल, उपअभियंता अशोक शेटे, राहुल गव्हाणकर आदी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुक्यातील गहूंजे-साळुंब्रे, शिवणे-सडवली, थुगाव-बऊर, कडधे-आर्डव या पुलांची कामे जलसंपदा विभागांतर्गत सुरु आहेत. दिनांक 30 जानेवारीपर्यंत कामे पूर्ण करुन पुल वाहतुकीसाठी खुले करावेत, अशा सुचना आमदार सुनिल शेळके यांनी या बैठकीत दिल्या आहेत. तसेच पवना पुर्नवसनाचा फेर मोजणी अहवालाचा आढावा यावेळी घेण्यात आला. ( Order to complete works of Gahunje-Salumbre Shivane-Sadvali Thugaon-Baur Kadhe-Ardav bridges )
अधिक वाचा –
– दिवड गावात भाजपाला खिंडार; आमदार शेळकेंच्या उपस्थितीत अनेक दिग्गजांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश
– लोणावळा शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विशाल पाडाळे; नवनियुक्त अध्यक्षांकडून नूतन कार्यकारिणी जाहीर, वाचा सविस्तर
– कशाळ शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नवनाथ जाधव यांची निवड; वाचा समितीमधील सदस्यांची संपूर्ण यादी