मावळ तालुक्यातील चांदखेड येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल कार्यारंभ आणि आदेश पत्र वाटप समारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मावळ तालुक्यातील सुमारे 17 हजार घराचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून याबाबत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेऊ अशी, माहिती यावेळी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री पाटील यांनी दिली. ( Guardian Minister Chandrakant Patil Distributed Order Letter To Beneficiaries To Start Gharkul At Chandkhed Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान सुखकर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत. या योजना तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना केले.
मावळ तालुक्यातील चांदखेड येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल कार्यारंभ व पत्र वाटप केले. योजनेअंतर्गत मावळमधील १७ हजार घराचे सर्व्हेक्षण करण्यात आले. केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.(१/२) pic.twitter.com/e28AfvLy1c
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) March 12, 2023
या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, पंचायत समिती माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, राजाराम शिंदे, सदस्य दत्तात्रय माळी, सरपंच मीना माळी यांच्या सह इतर अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– सोमाटणे टोलनाका कायमस्वरुपी हटवा, किशोर आवारे यांचे बेमुदत उपोषण – व्हिडिओ
– लोणावळा येथील वॅक्स म्युझियममध्ये लवकरच रामविलास पासवान यांचा मेणाचा पुतळा