Dainik Maval News : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स व न्यू इंग्लिश स्कूल टाकवे बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावीच्या मुलांसाठी परीक्षेत येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन वाकड येथील हायस्कूलमधील प्राध्यापिका दीपाली पाटील यांचे एक दिवसीय मार्गदर्शन ठेवण्यात आले. त्यांनी अभ्यास कसा करायचा याचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली.
या कार्यक्रमाचा लाभ दहावीच्या 130 विद्यार्थ्यांनी घेतला. कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर रोटरी चॅलेंजर्स अध्यक्षा ज्योती राजीवडे, शाळेचे मुख्याध्यापक आनंदराव जांभुळकर, उपमुख्याध्यापक आसवले, रोटरी चॅलेंजर्स ॲडव्हायझर नितीन शहा उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना उपमुख्याध्यापक आसवले यांनी केली.
यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन क्लबचे संपत लांडगे, प्रकल्प प्रमुख सुनील जाधव, भरत राजीवडे यांनी केले. यावेळी क्लबचे रवींद्र काळे, गणेश शेडगे, वैशाली काळे, ऋषिकेश कारके तसेच शाळेतील शिक्षक वर्ग आदी उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळमधील ‘हे’ गाव आहे संत संताजी जगनाडे महाराज यांचे जन्मगाव, जयंती निमित्त जाणून घ्या त्यांचे जीवनकार्य
– तुमच्या आमदाराला दर महिन्याला किती पगार मिळतो ? आमदारांना मिळणारे भत्ते आणि सुविधा वाचून धक्का बसेल
– मावळमधील शिक्षकांनी कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंसमोर मांडल्या समस्या । Maval News