व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधील ‘हे’ गाव आहे संत संताजी जगनाडे महाराज यांचे जन्मगाव, जयंती निमित्त जाणून घ्या त्यांचे जीवनकार्य

मावळमधील 'हे' गाव आहे संत संताजी जगनाडे महाराज यांचे जन्मगाव, जयंती निमित्त जाणून घ्या त्यांचे जीवनकार्य

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 8, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल
Sant-Jaganade-Maharaj

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महान संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची आज जयंती आहे. संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म 8 डिसेंबर 1624 रोजी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी झाला. विठोबा जगनाडे हे महाराजांचे वडील होत. विठोबा जगनाडे आणि आई मथाबाई हे विठ्ठलभक्त होते. त्यामुळे संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले.

सतराव्या शतकात महाराष्ट्रात कीर्तनाच्या माध्यमातून त्या काळचे संत आपल्या समाजाचे प्रबोधन करण्याचे काम करत होते. तेव्हा संत तुकाराम महाराज यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली होती. एकदा संत तुकाराम महाराज संताजी महाराज यांच्या गावी कीर्तनासाठी आले होते. तुकोबांचे कीर्तन ऐकून संताजी महाराजांच्या मनावर मोठा प्रभाव पडला.

त्यानंतर संताजींनी संसार सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र संसारात राहून परमार्थ साधता येतो, असे संत तुकाराम महाराजांनी सांगितल्यानंतर त्यांनी विचार बदलला. परंतु तेव्हापासून संताजी महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्यांमध्ये सहभागी झाले.

गाथांचे केले पुनर्लेखन – संत संताजी जगनाडे महाराज यांनी संत तुकाराम महाराजांच्या सावलीत राहून त्यांचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली. संत तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडविण्यात आल्या. मात्र तुकोबारायांचे सर्व अभंग हे संताजी महाराजांना तोंडपाठ होते. त्यामुळे त्यांनी त्यांचे सर्व अभंग जसेच्या तसे पुन्हा लिहून काढले.

जगनाडे महाराजांबाबत प्रसिद्ध आख्यायिका – असे म्हटले जाते की, मृत्यूनंतर शेवटच्या क्षणी तुमच्या पार्थिवावर माती टाकण्यासाठी येणार असे वचन संत तुकाराम महाराजांनी संत जगनाडे महाराजांना दिले होते. मात्र तुकाराम महाराज हे जगनाडे महाराजांच्या अगोदर वैकुंठाला गेले. त्यानंतर संताजी महाराजांचे निधन झाले, तेव्हा कितीही प्रयत्न केले तरी महाराजांचे संपूर्ण शरीर मातीत गाडले जात नव्हते. त्यांचा चेहरा सतत वर राहत होता. तेव्हा आपले वचन पूर्ण करण्यासाठी वैकुंठाहून संत तुकाराम महाराज आले आणि त्यांनी ३ मुठी माती टाकली. त्यानंतर जगनाडे महाराजांचा संपूर्ण देह झाकला गेला., अशी आख्यायिका आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देवाभाऊ 3.0 : “मी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…” राज्यात नव्या ‘देवेंद्र’पर्वाचा आरंभ । Maharashtra New CM
– मुख्यमंत्री बनताच देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर, पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत
– “मी अजित आशाताई अनंतराव पवार, गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की… अजित पवार यांनी विक्रमी सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ


Previous Post

तुमच्या आमदाराला दर महिन्याला किती पगार मिळतो ? आमदारांना मिळणारे भत्ते आणि सुविधा वाचून धक्का बसेल

Next Post

आनंदाची बातमी ! मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथे सुरु होणार नवीन केंद्रीय विद्यालय, केंद्र सरकारची मंजुरी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Kendriya Vidyalaya

आनंदाची बातमी ! मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथे सुरु होणार नवीन केंद्रीय विद्यालय, केंद्र सरकारची मंजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Taluka kharedi vikri sang demand Fund for Shetkari Bhavan letter to Cooperation Minister

मावळात शेतकरी भवन उभारणीसाठी निधी मिळावा ; मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सहकार मंत्र्यांना निवेदन

April 22, 2026
Chinmayi Sumit impressive speech at Vasant Lecture Series in Lonavala city

लोणावळा शहरातील वसंत व्याख्यानमालेत चिन्मयी सुमीत यांचे प्रभावी मनोगत ; मातृभाषा मराठी शाळा व संस्कृती जपण्याचे आवाहन

April 22, 2026
gas cylinder line

वडगावचा ‘ग्रामीण’चा शिक्का काढा, शहराप्रमाणेच २५ दिवसात सिलिंडर मिळू द्या ; नगराध्यक्षा अबोली ढोरे यांची मागणी

April 21, 2026
Crime

उर्से येथे जुगार खेळणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मालमत्ता कर वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेला नागरिकांचा प्रतिसाद ; तळेगाव नगरपरिषदेकडून ७३.१७ टक्के कर वसुली

April 21, 2026
MP Shrirang Barne MLA Sunil Shelke jointly reviewed development works in Lonavala Vadgaon Talegaon Dabhade

मावळात ‘आप्पा’ आणि ‘आण्णा’ यांचा संयुक्त दौरा ; लोणावळा, तळेगाव, वडगावमधील विकासकामांचा घेतला आढावा

April 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.