Dainik Maval News : वनपरिक्षेत्र शिरोता अंतर्गत येणाऱ्या नाणे, नाणोली व साई गावामधील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना वन, वणवे आणि वन्यप्राणी यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वनपरिक्षेत्र शिरोताचे वनअधिकारी यांच्याकडून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. वनविभाग शिरोता आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
वनपरिक्षेत्र शिरोता येथील वनपरिमंडळ अधिकारी एम.बी. घुगे, डी.डी. उबाळे, एस.बी. साबळे तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य जिगर सोलंकी यांनी विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण माहिती दिली.
व्हिडिओ क्लिपच्या सहाय्याने मार्गदर्शन करण्यात आले. यात वन, वणवे, वन्यप्राण्यांचे पर्यावरणातील महत्व, जंगलातील अन्नसाखळीचे महत्व, वणव्यांमुळे अन्नसाखळीवर होणारे दुष्परिणाम, वणवे लागण्याची कारणे, वणवे लागल्यावर उपाययोजना? याबद्दल माहिती देण्यात आली.
मुख्यवनसंरक्षक एन.आर. प्रविण, उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वनसंरक्षक अतुल जैनक, शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे, अध्यक्ष अनिल आंद्रे यांच्या नेतृत्वाखाली या जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाबाबत नवीन डेडलाईन ; 10 एप्रिलपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Lonavala News
– संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा ; भंडारा डोंगर येथे आजपासून गाथा पारायण व कीर्तन महोत्सव
– रसायनमिश्रीत सांडपाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई ; पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणावर पर्यावरण मंत्र्यांची भूमिका