हॅण्ड इन हॅण्ड इंडिया , तळेगाव (दाभाडे) आणि युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स (यु.एस.जी.आय) यांच्या मदतीने उपजीविका आणि पर्यावरण संवर्धनावर लक्ष केंद्रित करणारा ग्रीन व्हिलेज कार्यक्रम तुंग गावात राबवण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत तुंग गावात एम्प्लॉई एंगेजमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाचा उद्देश हा युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्सचे कर्मचारी यांना प्रकल्पाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या कामाची माहिती आणि कामाची प्रोग्रेस याची माहिती करून देणे त्याचबरोबर गाव विकासाच्या कामामध्ये सहभागी करून घेणे आणि त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, हा होता. ( Hand in Hand India NGO And Universal Sompo General Insurance Green Village Program At Tung Village Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर कार्यक्रमामध्ये यु.एस.जी.आय टीमचे तुंग ग्रामपंचायत आणि हॅन्ड इन हॅन्ड इंडिया यांच्या वतीने गुलाब पुष्प देऊन व शाळेतील मुलांनी स्वागत गीत गाऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर तुंग ग्रामपंचायतची थोडक्यात ओळख करून देण्यात आली. यु.एस.जी.आय टीमची ओळख करून देण्यात आली.
त्यानंतर तुंग गावातील यु.एस.जी.आय टीम, हॅन्ड इन हॅन्ड टीम व ग्रामस्थानच्या वतीने ग्रामपंचायत आणि परिसरातील स्वछता करण्यात आली. त्यावेळी यु.एस.जी.आय टीमने अत्यंत उत्सहात सहभाग होऊन स्वच्छता केली. स्वच्छता शिबिरानंतर तुंग ग्रामपंचायतीतील शाळेला भेट देण्यात आली. शाळेचे हेड मास्टर यांनी यु.एस.जी.आय टीमची विद्यार्थ्यांसोबत ओळख करून देण्यात आली. त्यानंतर चित्र कला स्पर्धा घेण्यात आली.
हेही वाचा – शिळींब गावात शासकीय योजनांबद्दल जनजागृती कार्यक्रम; अनेक नागरिकांना ई-श्रम, आरोग्य कार्ड आदी योजनांचा लाभ
View this post on Instagram
चित्रकला स्पर्धा संपताच ‘थ्री लेग रेस वीथ स्कूल चिल्ड्रेन’ हा गेम खेळण्यात आला. त्यानंतर मुलांना चॉकलेट आणि बिस्किट्स वाटप करण्यात आले आणि शाळेतील मुलांनी यु.एस.जी.आय टीम साठी स्वतः हाताने गिफ्ट बनवलेली त्यांना देण्यात आले. यु.एस.जी.आय आणि हॅण्ड इन हॅण्ड इंडिया टीम तुंग किल्ल्यावर ट्रेकिंग करण्यात आली. तुंग किल्ल्यावरून खाली आल्यास यु. एस. जी. आय टीम मेंबर्स ने पूर्ण दिवसभराचा अनुभव शेअर केला आणि सदर कार्यक्रमाचा आभिप्राय दिला. हॅन्ड इन हॅन्ड टीम यांच्यामार्फत यु.एस.जी.आय टीम चे आभार मानण्यात आले. ( Hand in Hand India NGO And Universal Sompo General Insurance Green Village Program At Tung Village Maval )
अधिक वाचा –
– ‘हॅण्ड इन हॅण्ड’ आणि ‘फिंचम इंडिया’ मार्फत महागावमध्ये शासकीय सामजिक सुरक्षा योजना जनजागृती कार्यक्रम
– मोरवे गावात शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जनजागृती कार्यक्रम; हॅण्ड इन हॅण्ड संस्थेचा स्तुत्य उपक्रम