Dainik Maval News : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून “हर घर तिरंगा” ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. “हर घर तिरंगा” “घरोघरी तिरंगा” मोहीम मोठ्या उत्साहात राबविण्याचे राज्य शासनाचे धोरणच्या अनुषंगाने शहरातील नागरिकांना आपल्या घरावरती, गच्चीवरती राष्ट्रध्वज फडकवण्याचे नगरपंचायत द्वारे आवाहन करण्यात आलेले आहे व तसेच नागरिकांना तिरंग्याचे मोफत वाटप करण्यात येत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मंगळवारी, दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी नगरपंचायत प्रांगणात ध्वजारोहण करून तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली व तसेच शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली, नागरिकांना तिरंगा ध्वजाचे वाटप करून सेल्फी पॉईंट वरती त्यांचे फोटो घेऊन शासनाचे वेबसाईट वरती अपलोड करण्यात आले. तिरंगा कॅनव्हास इत्यादी उपक्रम वडगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ प्रविण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. ( Har Ghar Tiranga Abhiyan Organized various events including Tiranga Daud Marathon by Vadgaon Nagar Panchayat )
त्याचप्रमाणे बुधवारी, दि. 14 ऑगस्ट रोजी नगरपंचायत प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात येईल व तसेच ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर तिरंगा दौड मॅरेथॉन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी सदर उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय, लाखो नागरिकांना होणार लाभ
– नगराध्यक्षांचा कालावधी आता अडीच ऐवजी पाच वर्षे ; राज्य सरकारचे अनेक मोठे निर्णय, वाचा सविस्तर
– लोणावळा ग्रामीण हद्दीत IPS सत्यसाई कार्तिक यांची मोठी कारवाई ; पाऊण कोटींचा मुद्देमाल जप्त, 10 जण ताब्यात

