ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात Asian Heart Hospital त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. थोड्याच वेळात मंत्री छगन भुजबळ एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहेत. ( Hari Narke passed away due to heart attack )
प्रा. हरी नरके यांचे मुंबई येथील एशियन हार्ट रुग्णालयात हृदय विकाराच्या झटक्याने आज ( 9 ऑगस्ट) सकाळी दुःखद निधन झाले. एक जेष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष या नात्याने प्रा. हरी नरके महाराष्ट्राला परिचित होते.
नरके यांना बुधवारी, दिनांक 9 ऑगस्ट सकाळी हृदयविकाराचा झटका, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तिथेच उपचारादरम्यान मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संशोधक, पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासन प्राध्यापक, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य, ज्येष्ठ साहित्यिक अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पेलल्या.
ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे. ते आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती राजर्षी शाहू… pic.twitter.com/JhYVny9Dia
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) August 9, 2023
हरी नरके यांच्या निधनाची बातमी अतिशय धक्कादायक आहे. मी विचार करू शकत नाही की हरी नरके आमच्यात नाहीत. महात्मा फुलेंच्या बाबतीत जुनी पुस्तके शोधून काढून ऐतिहासिक लिखाण लोकांसमोर आणण्याचे काम त्यांनी केली. फुले दाम्पत्याचं काम किती महत्त्वाचं होतं त्याची माहिती लोकांना पटवून देण्याचं काम हरी नरके यांनी केलं. त्यांच्या निधनाने समता परिषदेचं मोठं नुकसान झाल्याच्या भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळकेंनी शब्द पाळला आणि तब्बल 45 वर्षांनंतर उजळला खंडोबाचा माळ
– ‘अजितदादा पहिल्यांदाच माझ्यासोबत बसलेत…दादा…आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहात’, वाचा काय म्हटले अमित शाह?