Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत रेडी मिक्स कॉंक्रिट (आरएमसी) प्लांट्समुळे वाढत्या हवा आणि ध्वनी प्रदूषणाचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशा प्लांट्सवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अनेक ठिकाणी पर्यावरण विभागाची परवानगी न घेता हे प्लांट सुरू असल्याने श्वसनाचे विकार वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर चिंचवड मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देऊन अनधिकृत प्लांट्सवर तातडीने कारवाई करण्याची व ते बंद करण्याची मागणी केली आहे. ( Health of citizens in danger due to RMC plant )
- चिंचवड मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प सुरू असून, बांधकामांसाठी रेडी मिक्स कॉंक्रिट (आरएमसी) प्लांट्स वापरले जात आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात हवा आणि ध्वनी प्रदूषण होत आहे. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. यापार्श्वभूमीवर आमदार शंकर जगताप यांनी ही मागणी केली आहे.
आरएमसी प्लांट्समुळे सतत मोठ्या प्रमाणावर धूळ हवेत पसरत असल्याने नागरिकांना श्वसनासंबंधी त्रास होण्याची शक्यता आहे. तसेच, हे प्लांट्स रात्रंदिवस सुरू असल्याने मोठ्या वाहनांची वर्दळ आणि मशीनच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण वाढले आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाचे विकार असणाऱ्या नागरिकांना याचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. ( Unauthorized RMC plants running in violation of rules should be closed )
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन करून चालू असलेल्या या आरएमसी प्लांट्सवर तातडीने कारवाई करण्यात यावी, तसेच परवानगीशिवाय चालणारी सर्व प्लांट्स तात्काळ बंद करण्यात यावीत, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड : खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road
– रावेत ते तळेगाव दाभाडे बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजन ; पीएमआरडीए हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गांचा पर्याय
– आंबी येथील ‘नव ताझ धाम’ वृद्धाश्रमाचे उदघाटन ; समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज – राज्यमंत्री माधुरी मिसाळ