वडगाव शहर भारतीय जनता पक्ष आणि युवक प्रतिष्ठान यांच्या वतीने कमी ऐकू येणाऱ्या व्यक्तींना सवलतीच्या दरात श्रवणयंत्र वाटप करण्यात येणार आहे. रविवारी (दिनांक 12 डिसेंबर) रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वडगाव नगरपंचायतीचे माजी नगरसेवक भूषण मुथा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. कमी ऐकू येणाऱ्या नागरिकांना अवघ्या पाचशे रुपयांत हे श्रवणयंत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. ( Hearing Aid Distribution Program At discounted Price In Vadgaon Maval By BJP )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रविवारी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळात ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात होणार आहे. याचा शुभारंभ माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते होणार असून तालुका भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तसेच, नगरसेवक नील किरीट सोमय्या हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. वडगाव शहर भाजपा अध्यक्ष आनंता कुडे यांनी ही माहिती दिली.
अधिक वाचा –
– ‘दादा हो… आता तरी दिवे लावा’, वडगाव शहर भाजपाची नगरपंचायतला विनवणी, निवेदनातून वडगावकरांचा अंत न पाहण्याचा सल्ला
– मुंबई ते सोलापूर मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस; खंडाळा-लोणावळा घाट मार्गातील चाचणी पूर्ण – पाहा व्हिडिओ