Dainik Maval News : पर्यटननगरी लोणावळा शहरात पावसाने जोरदार बॅटींग केली आहे. मंगळवारी (दि. 24 जून) सकाळी सात वाजता घेतलेल्या नोंदीनुसार शहरात मागील 24 तासात तब्बल 171 मि.मी. इतका अर्थात 6.73 इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे.
सततच्या पावसाने लोणावळा शहर परिसरातील डोंगररांगेतील सर्वच ओहोळ प्रवाहीत झाले असून डोंगरावरून कोसळणारे धबधबे, धरत्रीने नेसलेला हिरवा शालू, ओव्हरफ्लो झालेले भूशी धरण, धुक्यात हरविलेले टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट आदीमुळे पर्यटननगरीचे निसर्ग सौंदर्य बहरले असून सर्वच ठिकाणे पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
लोणावळा शहरात 1 जून पासून जवळपास 1595 मि.मी. अर्थात 62.80 इंच इतका पाऊस झाला आहे. लोणावळा हे मावळ तालुक्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. सोबत तालुक्यातील अन्य ठिकाणाही पावसाची संततधार सुरूच आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात दहा दिवसांत विविध ठिकाणी ९ अजगर सापांना ‘वन्यजीव रक्षक मावळ’ व ‘शिवदुर्ग मित्र’च्या सर्पमित्रांकडून जीवदान । Maval
– राज्य सरकारने शब्द पाळला… आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान देण्यास मान्यता । Ashadhi Vari 2025
– जन्मदात्याकडून अल्पवयीन लेकीवर लैंगिक अत्या’चार ! लोणावळा शहाराजवळील संतापजनक घटना । Maval Crime
