Dainik Maval News : मावळ तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. पवन मावळ विभागाला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले असून या भागात हंगामातील विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील 24 तासात येथे तब्बल 374 मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या मुसळधार पावसामुळे पवना धरणात पाण्याची जोरदार आवक होत असून 24 तासात धरणाच्या जलाशयात तब्बल 13 टक्क्यांची विक्रमी वाढ नोंदविण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पवना धरणात बुधवारी सकाळी 6 वाजता घेतलेल्या नोंदीनुसार 54 टक्के पाणीसाठी जमा झाला होता. तर आज, गुरुवारी सकाळी 6 वाजता घेतलेल्या नोंदीनुसार धरणात 67.80 टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. याचा अर्थ धरणात 24 तासात 13 टक्के इतका पाणीसाठी जमा झाला आहे. यासह धरण परिसरात मागील 24 तासात तब्बल 374 इतका पाऊस झाला असून हा या हंगामातील विक्रमी पाऊस आहे. पावसाचा जोर असाच राहिल्याच लवकरच पवना धऱण ओव्हरफ्लो होईल. ( Heavy rain in Pawan Maval section 67 percent water storage in Pavana Dam )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! वडीवळे धरणातून कुंडलिका नदीत 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, नागरिकांनी काळजी घ्यावी
– अजित पवारांकडून मुंबई, पुणे, ठाणे शहरांसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा आढावा । Ajit Pawar
– लोणावळ्यात देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर, पदाधिकाऱ्यांनी देखील केले रक्तदान । Lonavala News