हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लोणावळा शहरात भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 28 जानेवारी ते दिनांक 3 जानेवारी या काळात ही स्पर्धा ‘हिंदूहृदयसम्राट चषक-2023’ या नावाने पार पडत आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दिनांक 28 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. ( Hinduhridaysamrat Cup 2023 Cricket Tournament In Lonavala city )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ असोसिएशन अधिकृत रजिस्टर संघ तसेच लोणावळा शहर ओपन संघ यांच्या माध्यमातून लोणावळा शहरात हे क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले आहेत. दिनांक 23 जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 97 वी जयंती झाली, या निमित्ताने मावळ तालुक्यातील भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेचे संपूर्ण नियोजन-आयोजक जयवंत दळवी (शिवसेना समन्वयक लोणावळा शहर), युवासेना चिटणीस शाम सुतार, सल्लागार रामभाऊ थरकुडे आणि समर्थ स्पोर्ट्सचे मालक सोमनाथ ठोंबरे यांनी केले आहे.
हेही वाचा – ‘लक्ष्मण भाऊंच्या निधनापूर्वीच भाजपकडून निवडणूकीची तयारी’, आमदार सुनिल शेळकेंच्या आरोपांमुळे खळबळ
शिवसेना मावळ तालुका संपर्क प्रमुख लोणावळा शहर निरीक्षक प्रभाकर पवार, उपजिल्हा प्रमुख सुरेशभाऊ गायकवाड, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, महिला आघाडी पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख शदानभाभी चौधरी, संघटक सुभाष डेनकर, खंडाळा विभाग संघटक आणि युवा उद्योजक परेश बडेकर, युवा उद्योजक धनंजय साळुंखे, महिला आघाडी जिल्हा संघटिका शैलाताई खंडागळे, तालुका संघटक अनिल ओव्हाळ, युवासेना चिटणीस पिंपरी-चिंचवड अभिजीत गोफन, उद्योजक शत्रुघ्न खंडेलवाल, युवासेना उपशहर अधिकारी विवेक भांगरे, धीरज मोहोळ, शिवसेना अवजड वाहतुक सेना संघटक नरेश भाऊ काळवीट, वाहतुक सेना उप-अध्यक्ष पंकज खोले, विभागप्रमुख बाळासाहेब मोहोळ, मंगेश येवले, उपविभाग प्रमुख सचिन गोणते, शाखाप्रमुख अमोल शिंदे, गटप्रमुख कल्पेश ठोंबरे, अक्षय चव्हाण, गोपी चव्हाण, ॠषी थरकुडे, 11 हनुमान क्रिकेट संघाचे खेळाडू सुनील साठे, पंकज देशमुख, सचिन लाल, यश राऊत, विनोद पेशकर, ओमकार सुतार, सुजल सुतार ,चिंतन सुतार आदीजण यावेळी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मावळकट्टा । लोणावळा-खंडाळा येथील शिवकालीन अज्ञात व्यक्तीची ‘ही’ समाधी-छत्री अभ्यासकांचे वेधतेय लक्ष
– भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
– ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ आपले राज्यगीत ते १२ नवीन समाजकार्य महाविद्यालय स्थापणार; वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय एका क्लिकवर