Dainik Maval News : राज्यासह देशभरात धुळवड उत्साहात साजरी करण्यात आली. परंतु या धुळवडीला दु:खाचं गालबोट लागले आहे. मावळ तालुक्यात हृदय हादरवून टाकणारी घटना घडली आहे. इंद्रायणी नदीत बुडून तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
होळीच्या सणाची सुट्टी साजरी करण्यासाठी आलेल्या तीन तरुणांनी आपला जीव गमावला. घरकुल येथील 5 तरुण इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी उतरले. त्यापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला. हे तरुण मावळमधील किन्हई गावात असलेल्या बोडकेवाडी बंधारा इंद्रायणी नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र नदीतील पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने यातील तिघांचा बुडून मृत्यू झाला.
वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्याकडून मृतदेह शोधण्याचे काम करण्यात आले. तीनही मृतदेह शोधण्यात यश आले आहे. आकाश घोर्डे वय 23, राज आगमे वय 25, आणि गौतम कांबळे वय 24, अशी मृत तरुणांची नावे आहेत. देहूरोड पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक : छाननीत पाच अर्ज बाद, 195 अर्ज वैध
– मावळात जेई लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्धार ; 1 वर्षे ते 15 वर्षे वयोगटातील बालकांचे केले जाणार लसीकरण । Maval News
– मावळातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ‘ती’ चार ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयास जोडण्यास गृह विभागाचा नकार ? । Maval News