Dainik Maval News : “आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025” या सहकार विभागाच्या अभियानाअंतर्गत, आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मावळ यांच्या माध्यमातून रविवारी (दि. 16 फेब्रुवारी) हौसिंग दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हौसिंग दरबाराचा कार्यक्रम वडगाव मावळ येथील विशाल लॉन्स मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक निबंध सर्जेराव कांदळकर यांनी दिली.
- आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ या सहकार विभागाच्या अभियाना अंतर्गत सहकार विभागामार्फत संस्था व सभासद हिताचे विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन मावळ तालुक्यात कार्यरत असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सोई सुविधा व सभासदांच्या असलेल्या अडचणी बाबत हौसिंग दरबार घेण्यात येणार आहे.
हौसिंग दरबारात सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या दैनंदिन कामकाजात निर्माण होणाऱ्या अडचणी, संस्थेच्या जमीन मालकीचे अभिहस्तांतरण, सहकारी संस्थाच्या व्यवस्थापक समितीच्या निवडणूका, सहकारी गृहनिर्माण संस्थाचे नियमित लेखापरीक्षण व दोषदुरुस्ती या विषयावरही कार्यक्रमात कार्यालयाकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात सहकार खात्याचे अधिकारी, पुणे जिल्हा हौसिंग फेडरेशन यांचे पदाधिकारी व अन्य तज्ञ व्यक्तींमार्फत सहकारी संस्थाना मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी मावळ तालुक्यातील सर्व गृहनिर्माण संस्थासाठी रविवारी (दि.16) रोजी आयोजित केलेल्या हौसिंग दरबारास उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड : खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road
– रावेत ते तळेगाव दाभाडे बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजन ; पीएमआरडीए हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गांचा पर्याय
– आंबी येथील ‘नव ताझ धाम’ वृद्धाश्रमाचे उदघाटन ; समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज – राज्यमंत्री माधुरी मिसाळ