तुम्हाला तुमच्या नावावर किती मोबाईल सीम कार्ड आहेत, हे माहितीये का? किंवा तुम्ही तुमच्या नावावर दुसरेच कुणी सीम कार्ड वापरत असेल तर? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हवी असेल, तर हा लेख नक्की वाचा… सीम कार्ड म्हणजे नक्की काय? तर SIM या शब्दात त्याचा अर्थ दडलेला आहे. SIM अर्थात सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल (SIM Card) असा त्याचा अर्थ होतो. मोबाईलमध्ये सीम कार्ड नसल्यास कॉल, मेसेज आणि इंटरनेट वापरू शकत नाही. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सीम कार्डमध्ये आपले ठिकाण, फोन नंबर, वर्क नेटवर्क माहिती, वैयक्तिक माहिती इत्यादी अनेक गोष्टी समाविष्ट असतात. दरम्यान भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने एक नवीन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलद्वारे तुम्ही तुमच्या फोनवर किती सिमकार्ड नोंदणीकृत आहेत आणि तुमच्या फोनवर एकापेक्षा जास्त सिमकार्ड असल्यास आणि तुम्ही ते वापरत नसताना सीम कार्ड कसे बंद करावे, हेही तपासू शकता. ( How To Check All Sim Cards Registered On Your Name Check Details )
तुमच्या नावावर किती सीम कार्ड –
- तुमच्या नावावर किती सीम कार्ड आहेत, हे चेक करण्यासाठी अगोदर मोबाईलमध्ये https://tafcop.sancharsaathi.gov.in/telecomUser/loginPage?logout ही लिंक उघडा.
- या वेब पोर्टलवर तुम्हाला तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत याची माहिती मिळू शकते.
- जर तुमच्या ओळखपत्राच्या आधारे कोणीतरी बनावट सिम कार्ड वापरत असेल तर त्याचीही माहिती मिळेल.
तुमच्या नावावर एकूण किती सिम कार्ड/मोबाईल क्रमांक रजिस्टर आहेत ते आता बघू शकता.
तुम्हाला नको असलेला मोबाईल क्रमांक येथूनच बंद करण्याची विनंती देता येऊ शकेल.
भारतीय संचार विभागाची लिंक :https://t.co/JO75225ndD pic.twitter.com/bhjvuBVZSD
— स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य (@Mpsc_Andolan) November 19, 2023
असं तपासा –
- पोर्टलवर तुम्हाला तुमचा सध्याचा मोबाईल नंबर टाकावा लागेल.
- त्यानंतर रिक्वेस्ट OTP बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर चालू मोबाइल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाइलवर एक OTP येईल
- त्यानंतर तुम्हाला तो ओटीपी बॉक्समध्ये टाकावा लागेल आणि व्हॅलिडेट बटणावर क्लिक करावे लागेल.
- मोबाईल आणि OTP अद्याप नसल्यास OTP पुन्हा पाठवा लिंकवर क्लिक करा.
- आता व्हॅलिडेट वर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या आयडी प्रूफ आणि मोबाईल नंबरची यादी दिसेल जी सक्रीय आहेत.
- तुम्ही वापरत असलेल्या क्रमांकाव्यतिरिक्त तुम्ही वापरत नसलेले किंवा तुमचे नसलेले नंबर तुम्हाला दिसल्यास, तुम्ही सिम कार्ड बंद करू शकता.
अधिक वाचा –
– ‘…अन्यथा शासनाला गावकारभाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल’, गावखेड्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याची सरपंच परिषदेची मागणी
– मोठी बातमी! टायगर पॉईंट इथे मध्यरात्रीपर्यंत दुकाने सुरु ठेवणाऱ्या टपरी चालकांवर लोणावळा पोलिसांची कारवाई
– आता घरबसल्या काढा स्वतःचे नवीन रेशनकार्ड! जाणून घ्या ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया