महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल (HSC Exam 2024 Result) मंगळवारी (दि. 21 मे) जाहीर झाला. यात पुणे बोर्ड अंतर्गत लोणावळा केंद्राचा (ता. मावळ) निकाल 95.11 टक्के लागला आहे. खास बाब म्हणजे लोणावळा केंद्रातील आर्यन राजेंद्र दळवी हा गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळवत राज्यात पहिला आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आर्यनला बारावीला एकूण 600 पैकी 547 अर्थात 91.17 टक्के गुण मिळाले आहे. त्यात त्याला गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळालेत. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतूक होत आहे. ( HSC 12th Exam Result Aryan Dalvi Lonavala First in maharashtra in Mathematics )
आर्यन हा लोणावळ्यातील प्राध्यापक शिवाजी काळे यांच्या आर.के. अकॅडमीचा विद्यार्थी असून त्याचे दहावी पर्यंतचे शिक्षण ॲड बापूसाहेब भोंडे हायस्कूल लोणावळा येथे झाले आहे. तर, व्ही.पी.एस हायस्कूल आणि द.पु. मेहता ज्युनिअर कॉलेज लोणावळा या विद्यालयाचा तो विद्यार्थी आहे.
अधिक वाचा –
– पवना ज्युनिअर कॉलेजची उज्वल निकालाची परंपरा कायम, सलग तिसऱ्या वर्षी विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के, वाचा अधिक
– मतमोजणीची तयारी झाली ! मावळ लोकसभेची ‘इथे’ होणार मतमोजणी, काय आहेत नियम ? वाचा सविस्तर
– मोठी बातमी ! तळेगाव शहराच्या कचरा डेपो परिसरात तरूणाची आत्म’हत्या, झाडाला शर्ट… । Talegaon Dabhade Crime