Dainik Maval News : वीकेंडमुळे रविवारी (दि. 1 जून) कार्ला येथे एकविरा देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक आले होते. वाहनांची संख्या वाढून भाविकांच्या गर्दीमुळे भक्तांचा महापूर आल्याचे भासत होते. गडमाथा आणि पायथा भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.
एकविरा देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक आल्याने गडावर देवीच्या दर्शनासाठी लांबलचक रांग लागली होती. सोबत गडापासून पायथा मंदिरापर्यंत भाविकांची रीघ लागली होती. देवीच्या दर्शनासाठी भाविकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते. संध्याकाळपर्यंत हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.
- मावळातील निसर्ग बहरल्याने कार्ला, लोणावळ्यासह परिसरात निसर्ग पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले होते. वीकेंडमुळे पुणे, मुंबई, ठाणे भागातून पर्यटक आले होते. लोहगड, विसापूर किल्ले परिसर, भाजे-कार्ला लेणी परिसर अशा सर्वत्र पर्यटकांची गर्दी होती.
एकाच दिवशी मोठ्या संख्येने भाविक आल्याने वाहनांचीही संख्या वाढली. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने कार्ला फाटा येथे मोठी वाहतूक कोंडी झाली. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली. सायंकाळपर्यंत पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.
ढगाळ वातावरण, मधून पडणारा पाऊस, परिसरात पसरलेली हिरवाई यामुळे वातावरण अगदी अल्हाददायक बनले होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जून महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– जिल्हाधिकाऱ्यांकडून मावळच्या सर्वांगीण विकासाला गती ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक
– पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील 15 ‘ब्लॅक स्पॉट’ची दुरुस्ती । Pune Mumbai Highway