बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. आयबीपीएस ( IBPS ) अर्थात बँकिंग कर्मचारी निवड संस्थेमार्फत ( Institute of Banking Personnel Selection ) भरतीची अधिसुचना जारी करण्यात आली आहे. तब्बल 8594 जागांवर ही भरती होणार आहे.
IBPS RRB अधिसूचना 2023 @ibps.in – या जाहिरातीनुसार ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया आजच म्हणजेच दिनांक 1 जूनपासून सुरू होत आहे. दिनांक 21 जूनपर्यंत ही प्रकिया चालेल. अर्जातील दुरुस्ती आणि शुल्क जमा करण्यासाठीची विंडो 21 जूनपर्यंत उघडली जाईल, यासर्व घटकांची माहिती अधिसूचनेत उपलब्ध आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यामुळे आता सरकारी बँकेत लिपिक आणि पीओ ( Bank Probationary Officer ) बनण्याची इच्छा असलेले उमेदवार आजपासून ibps.in या अधिकृत वेबसाइटवर भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जारी केलेल्या अधिसूचनेतील सर्व आवश्यक माहिती वाचणे आवश्यक आहे. ( IBPS RRB Notification 2023 8600 Vacancies Online Registration Started For PO Clerk Posts Check Exam Date )
IBPS RRB PO 2023 भरतीसाठी अर्ज कसा करावा;
टप्पा 1 – अधिकृत वेबसाइट ibps.in ला भेट द्या
टप्पा 2 – होमपेजवर ‘RRB PO Clerk Application Link’ वर क्लिक करा
टप्पा 3 – नोंदणी करा आणि अर्ज भरा
टप्पा 4 -सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा
टप्पा 6 – फॉर्म सबमिट करा आणि एक प्रत तुमच्याकडे जतन करा.
काही महत्त्वाच्या तारखा –
ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया आज 01 जूनपासून सुरू होत असून ती 21 जूनपर्यंत चालणार आहे. अर्जातील दुरुस्ती आणि शुल्क जमा करण्याची विंडो 21 जूनपर्यंत उघडली जाईल. 17 जुलै ते 22 जुलै या कालावधीत पूर्वपरीक्षेचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. ऑनलाइन प्रिलिम्स परीक्षा ऑगस्ट 2023 मध्ये आयोजित केली जाईल, ज्याचा निकाल सप्टेंबर महिन्यात जाहीर केला जाईल. अर्ज, निवड आणि भरतीशी संबंधित संपूर्ण माहिती अधिसूचनेत दिली आहे.
अधिसुचना वाचण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळ प्रांताच्या राजमाता अहिल्याबाई होळकर । Ahilyabai Holkar Jayanti 2023
– ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत मावळ तालुक्यातील 3 हजार 68 नागरिकांना विविध सेवा आणि योजनांचा लाभ