व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ प्रांताच्या राजमाता अहिल्याबाई होळकर । Ahilyabai Holkar Jayanti 2023

काळाची पावले ओळखणार्‍या कुशल प्रशासक, प्रजाहितदक्ष, कर्तृत्ववान आणि कार्यक्षम शासनकर्त्या 'पुण्यश्लोक' राजमाता अहिल्याबाई होळकर यांची आज (31 मे) जयंती, त्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 31, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
Rajmata-Ahilyabai-Holkar

Photo Courtesy : Dainik Maval Graphics Team


मावळ प्रांताच्या राजमाता म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या थोर महाराणी म्हणजेच अहिल्याबाई होळकर ( Rajmata Ahilyabai Holkar ) यांची आज जयंती. आपल्या कार्यकाळात राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले आणि त्यांचा जीर्णोद्धारही केला. ‘सर्वांना समान न्याय’ या त्यांच्या बाण्यामुळे अहिल्याबाई होळकर यांच्या न्यायप्रियतेची ख्याती सर्व दूर पसरलेली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

अहिल्याबाईंचा जन्म ‘चौंडी, बीड’ इथे माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकरांच्या मुलाशी ‘खंडेरावांशी’ झाले. खंडेरावांपासून अहिल्याबाईंना मालेराव व मुक्ताबाई ही दोन अपत्ये झाली. खंडेराव हे कुंभेरीच्या लढाईत मरण पावले, तेव्हा अहिल्याबाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या, पण सासरे मल्हारराव यांनी त्यांना थांबवले. ‘प्रजाहितासाठी सती जाऊ नये, हे राज्य सांभाळायचे आहे’ असे म्हटले. तेव्हा सासऱ्यांच्या इच्छेचा अहिल्याबाई होळकरांनी मान राखला आणि सती न जाता राज्यकारभारावर लक्ष केंद्रित केले.

‘पुण्यश्लोक’ राजमाता अहिल्याबाई होळकर या पहिल्या स्त्री होत्या, ज्यांनी स्त्रियांची सेना बनवून नारी शक्तीचा परिचय जगाला करून दिला. त्या एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. न्यायप्रिय, पराक्रमी योद्धा, आणि सर्वश्रुत धनुर्धर यात पारंगत होत्या. होळकर घराण्याचा ‘तत्वज्ञानी राणी’ म्हणून त्यांचा परिचय होता.

राणी अहिल्यादेवी यांनी तत्कालीन राज्यकारभारात अनेक बदल घडवून आणले. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली; गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले. नदी घाट बांधले, त्यावरील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. अनेक देवळांच्या आश्रयदात्या बनल्या. मंदिरांसाठी काम करूनही त्यांनी धर्माच्या नावाखाली असलेल्या अनेक रूढ, अनिष्ट प्रथांना छेद दिला.

काळाची पावले ओळखणार्‍या कुशल प्रशासक, प्रजाहितदक्ष, कर्तृत्ववान आणि कार्यक्षम शासनकर्त्या ‘पुण्यश्लोक’ राजमाता अहिल्याबाई होळकर यांची आज (31 मे) जयंती, त्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.

अधिक वाचा –
– ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत मावळ तालुक्यातील 3 हजार 68 नागरिकांना विविध सेवा आणि योजनांचा लाभ
– आंदर मावळातील खांडी गावात जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त कार्यक्रम; 85 महिला आणि मुलींचा समावेश


dainik maval jahirat

Previous Post

‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत मावळ तालुक्यातील 3 हजार 68 नागरिकांना विविध सेवा आणि योजनांचा लाभ

Next Post

एक वर्षापूर्वी झालेल्या ‘त्या’ चोरीच्या गुन्ह्याचा वडगाव मावळ पोलिसांकडून छडा, मुद्देमालासह आरोपी गजाआड

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
vadgaon-maval-police

एक वर्षापूर्वी झालेल्या 'त्या' चोरीच्या गुन्ह्याचा वडगाव मावळ पोलिसांकडून छडा, मुद्देमालासह आरोपी गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.