मावळ तालुक्यातील आंदर मावळ विभागातील भोयरे शाळेतील 220 विद्यार्थ्यांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले आहे. कोंडिवडे गावचे युवा उद्योजक योगेश कडू यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोयरे येथील 220 विद्यार्थ्यांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. ( Identity Cards Distributed To 220 Students Of ZP School Bhoyre In Andar Maval Division Of Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शाळा व विद्यार्थी यांच्यासाठी भविष्यातही मदत करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. सदर कार्यक्रम प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष राजू करवंदे, पोलीस पाटील मंगेश आडिवळे, गोरख जांभुळकर, काशिनाथ आडिवळे, निलेश आडिवळे विशाल सोनवणे, रमेश भोईरकर,ऋषिकेश भोईरकर, शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक तानाजी शिंदे सर यांनी केले तसेच शाळेतील संध्या नवथळे, मोहन भोईरकर, मारुती खुरसुले, अर्चना गाढवे यांनी सदर कार्यक्रम पार पडण्यास सहकार्य केले.
अधिक वाचा –
– वारंगवाडीत नागाला जीवदान, वन्यजीव रक्षक संस्थेचे सर्पमित्र प्रशांत भालेराव यांचे ग्रामस्थांकडून कौतूक – व्हिडिओ
– शिळींब गावातील आदिवासी समाजातील नवमतदारांच्या नोंदणीसाठी मंगळवारी (6 डिसेंबर) विशेष कॅम्प