Dainik Maval News : वडगाव शहरातील तरुणाईमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेमागे शहरातील अवैध धंदे असून हे सर्व अवैध धंदे पोलिसांनी तातडीने बंद करावेत, अशी मागणी करणारे निवेदन वडगाव शहर भाजपाने वडगाव मावळ पोलीस निरीक्षक यांच्याकडे सोपविले आहे.
वडगाव शहर ही तालुक्याची प्रशासकीय राजधानी आहे. तसेच येथे शाळा व वरीष्ठ महाविद्यालय असल्याने येथे युवा वर्ग व तालुक्यातील नागरीकांची कायमच वर्दळ असते. वडगाव शहराची ओळख सांस्कृतिक केंद्र व क्रीडापंढरी म्हणून देखील आहे आणि ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेले श्री पोटोबा महाराज देवस्थान गावात आहे.
गावची ओळख व नावलौकिक वेगळ्या स्वरूपाचा आहे. परंतु मागील काही दिवसांत वडगावची ही ओळख पुसट होऊन अवैध धंदे व व्यसनाधीनतेचे शहर म्हणून होऊ पाहत आहे. भविष्यातील वाढत्या गुन्हेगारीचा हा पाया आहे, म्हणून पोलिसांनी तातडीने कारवाई करून शहरातील अवैध धंद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करावेत.
पोलीस प्रशासन जी कारवाई करेल, त्यात भाजपा सहकार्य करेल, अशीही भुमिका मांडण्यात आली. यावेळी भाजप शहराध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर, श्री पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे यांच्यासह माजी नगरसेवक रविंद्र म्हाळसकर, अमोल पगडे, भाजयुमोचे अध्यक्ष आतिश ढोरे, मकरंद बवरे, शरद मोरे, कल्पेश भोंडवे, विकी म्हाळसकर, नितीन ओव्हाळ, भोलेनाथ म्हाळसकर उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आनंदाची बातमी ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता २ ऑगस्ट रोजी वितरित होणार
– देहू नगरपंचायतीचे नागरिकांना आवाहन ; मिळकत धारकांनी ‘या’ योजनेचा लाभ घ्यावा । Dehu News
– तळेगाव दाभाडे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या घराबाहेर जादूटोण्याचा प्रकार; घटना सीसीटीव्हीत कैद
– चाकण, नाशिक फाटा येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात; मंत्रालयात विशेष बैठक संपन्न