मावळ भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांच्या मागणीला यश आले असून जून – जुलै २०२४ च्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात इंदोरी कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील जोडरस्ता व मोठ्या पुलाच्या बांधकामास 8 कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
त्यानुषंगाने शुक्रवारी कुंडमळा इंदोरी येथे विकास रामगुडे, मुख्य अभियंता, संकल्पचित्र विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रविंद्र भेगडे यांनी उपस्थित राहून सबंधित अधिकारी कर्मचारी यांना या पुलाच्या कामाबाबत पुढील कार्यवाही जलद गतीने करण्याच्या सूचना दिल्या. ( Important news 8 crores sanctioned for new bridge over Indrayani River at Indori Kundmala )
यावेळी एम.एस. बारभाई कार्यकारी अभियंता सा.बां.(उत्तर) विभाग पुणे, डी.एच. दराडे उपअभियंता सा. बां.उपविभाग वडगाव मावळ, ए.पी.पोळ सहाय्यक अभियंता सा.बां.उपविभाग वडगाव मावळ, ग्रा.सदस्य इंदोरी दत्तात्रय भेगडे, सचिन भेगडे, मयूर शेलार, प्रफुल शेलार, मनेश भेगडे, सुनील भेगडे आदी प्रमुख उपस्थित होते.
अधिक वाचा –
– तळेगावात अपघात ! भरधाव कारने 7 वर्षीय चिमुकल्याला उडवले । Talegaon Dabhade
– मावळात यांत्रिक पद्धतीने भात लागवड ; शेतकऱ्यांनी भात शेतीत यांत्रिकीकरणाचा वापर करण्याचे कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
– मोठी बातमी ! एकविरा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी दीपक हुलावळे, खासदार सुरेश म्हात्रे यांची मुख्य विश्वस्त म्हणून निवड