Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघात दाखल झालेल्या एकूण 18 उमेदवारी अर्जांमधून छाननीअंती 6 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. तर एकूण 12 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहेत. अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घ्यायची आहे, त्यांना दिनांक 4 नोव्हेंबर, दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे.
मावळ विधानसभा निवडणूक कार्यालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे, मंगळवारी (दि.29) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतेपर्यंत एकूण 18 उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. 18 उमेदवारांनी मिळून एकूण 26 नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. बुधवारी (दि.30) दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. त्यात 6 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज विविध कारणांमुळे बाद झाले. तर 12 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
अर्ज वैध ठरलेले उमेदवार
सुनिल शंकरराव शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), रविंद्र नानाभाऊ वाघचौरे (भिम सेना), रुपाली राजेंद्र बोचकेरी (भारतीय लोकशक्ती पार्टी), अगरवाल मुकेश मनोहर (अपक्ष), अण्णा उर्फ बापू जयवंतराव भेगडे (अपक्ष), गोपाल यशवंतराव तंतरपाळे (अपक्ष), दादासाहेब किसन यादव (अपक्ष), पांडुरंग बाबुराव चव्हाण (अपक्ष), बिधान सुधीर तरफदार (अपक्ष), रविंद्र आण्णासाहेब भेगडे (अपक्ष), सुरेश्वरी मनोजकुमार ढोरे (अपक्ष), संतोष रंजन लोखंडे (अपक्ष)
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण 18 उमेदवारांकडून अर्ज दाखल ; शेवटच्या दिवशी 14 उमेदवारांनी भरला अर्ज
– मावळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निरिक्षक गार्गी जैन यांनी घेतला मतदान केंद्रांचा आढावा । Maval Vidhan Sabha
– मावळ तालुक्यात पारंपारिक भात कापणीला यंत्राची जोड ; पवनमावळात यंत्राच्या साहाय्याने भात कापणी सुरू