Dainik Maval News : इंदिरा शिक्षण समुहाच्या परंदवडी कॅम्पस मधील चाणक्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे उदघाट्न क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते गुरुवारी (दि.२३) संपन्न झाले. याप्रसंगी श्री चाणक्य एज्यूकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सरिता वाकलकर, मुख्य मार्गदर्शिका डॉ. तरिता शंकर, अर्जुन पुरस्कार विजेते सचिन खिलारी, शिक्षण समूह सल्लागार प्रा. चेतन वाकलकर, व्ही.एम. म्हस्के, अशोक विखे-पाटील, शिवाजी काळे, आदित्य काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘इंदिरा’ने सचिन सारखा खेळाडू देशाला दिला. इंदिरा कॅम्पस मधील आधुनिक सोयीसुविधा पाहून मला समाधान वाटले. सचिन खिलारे सारखा प्रतिभावान ऑलंपियन देशाला दिला, याचा मला अभिमान आहे, असे गौरवोद्गार मंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी काढले. यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळात ठसा उमटविलेले माजी विद्यार्थी इब्राहिम रझा खान, सचिन खिलारी, गरिमा खुशवाह यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
जगात प्रत्येकाला दुःख, अडी-अडचणी, ताण-तणाव आहेत. सगळेच मनासारखे होत नाही. त्यामुळे संकटांना सामोरे जा, संघर्ष करा, कष्टाला पर्याय नाही. इच्छाशक्ती प्रबळ असल्यास आपोआप मार्ग दिसतो. जो ध्येय ठरवून प्रामाणिक कष्ट करतो, संघर्ष करतो निश्चितपणे येणारे दिवस हे त्याचेच असतात, असे प्रतिपादन मंत्री भरणे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. तरिता शंकर यांनी केले. पल्लवी पवार, पूर्णा शंकर यांनी सूत्रसंचालन केले. निलेश उके यांनी आभार मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? पाहा संपूर्ण यादी – महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री
– ‘एमएसआयडीसी’कडून तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामाचा मसुदा सादर, आता निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
– मावळच्या विकासासाठी कटिबद्ध, जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार – खासदार श्रीरंग बारणे