Dainik Maval News : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे नाव कारखान्याला असल्याने कारखान्याला तुकाराम महाराजांचे आशीर्वाद आहेत, त्यांच्या नावामुळेच कारखान्याची प्रगती होत असून, भविष्यातही कारखाना प्रगती करत राहील, असे गौरवोद्गार शांतिब्रह्म गुरुवर्य मारोती महाराज कुऱ्हेकर यांनी श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात काढले.
संत तुकाराम साखर कारखान्याचा इथेनॉल प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा शांतिब्रह्म कुऱ्हेकर, हभप चंद्रकांत महाराज वांजळे यांच्या हस्ते व कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी कीर्तनकार माऊली कदम, माजी खासदार अशोक मोहोळ, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी आमदार विलास लांडे, माजी आमदार रूपलेखा ढोरे, पैलवान अमोल बुचडे, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, बाळासाहेब काशीद, सविता दगडे, सुनील चांदेरे, बाबूराव वायकर, शंकरराव शेलार, भाऊसाहेब पानमंद आणि सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
- कारखान्याच्या उभारणीत संत तुकाराम महाराजांचा मोठा आशीर्वाद मिळाला आहे. संत तुकाराम महाराजांच्या आशिर्वादाने आणि वारक-यांच्या पुण्याईने कारखाना प्रगतीपथावर आहे. या कारखान्याने नेहमीच शेतकर्यांचे हित जोपासले आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदूरा नवले यांनी यावेळी केले. यावेळी आमदार विलास लांडे, कीर्तनकार हभप माऊली महाराज कदम व हभप चंद्रकांत महाराज वांजळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
बापूसाहेब भेगडे यांनी प्रस्ताविकात सांगितले की, परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या घामाचा जास्त मोबदला मिळावा म्हणून संचालक मंडळाने सर्वांच्या सहकार्याने फक्त साखर उत्पादनावरच न थांबता सहवीजनिर्मिती प्रकल्प आणि आता केंद्र सरकारच्या माध्यामातून इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित केला आहे. फक्त अकरा महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण झाला असून, संपूर्ण देशात एवढ्या कमी वेळात प्रकल्प पूर्ण होण्याचा हा विक्रम आहे. तसेच त्यांनी कारखाना सभासद आणि कामगारांसाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच भविष्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी पृथ्वीराज मोहोळ व सुरेश चिंचवडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संचालक माउली दाभाडे, अनिल लोखंडे, तुकाराम विनोदे, बाळकृष्ण कोळेकर, चेतन भुजबळ, दिलीप दगडे, शिवाजी पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. चेतन भुजबळ यांनी सूत्रसंचालन तर अनिल लोखंडे यांनी आभार मानले. उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, संचालक तुकाराम विनोदे, दिलीप दगडे, चेतन भुजबळ, बाळकृष्ण कोळेकर, शिवाजी पवार, बाळासाहेब बावकर, अंकुश उभे, मधुकर भोंडवे, सुभाष राक्षे, महादेव दुडे, शामराव राक्षे, दिनेश मोहिते, ज्ञानेश नवले, नरेंद्र ठाकर, सखाराम गायकवाड, शुभांगी गायकवाड, ताराबाई सोनवणे, प्रवीण काळजे, साहेबराव पठारे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– 40 कोटीची पाणीपुरवठा योजना, 7.5 कोटीचे शॉपिंग सेंटर, संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे – वाचा वडगाव नगरपंचायतीच्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये
– लोणावळा शहर व ग्रामीण हद्दीतील 5 पानटपऱ्यांवर पोलिसांची कारवाई ; विद्यार्थ्यांना पानामधून अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचा संशय
– अजित पवारांच्या मावळातील पदाधिकाऱ्याचे कृत्य ; जन्मदात्रीला केली मारहाण, आईने माध्यमांसमोर येत केले पितळ उघडे