Dainik Maval News : माळेगाव खुर्द (ता. मावळ) येथील सेवाधाम ट्रस्ट संचलित आश्रमशाळेच्या नूतन मुलांच्या वसतीगृहाचा उद्घाटन सोहळा आणि वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा शनिवारी (दि. १७) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी मावळचे आमदार सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
मावळ तालुक्यातील माझ्या आदिवासी बांधवांच्या मुला-मुलींना शिक्षणसेवा उपलब्ध करुन देणा-या या शाळेतील वसतीगृह इमारत बांधकामास सहकार्य करण्याचे सौभाग्य मला लाभले याचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया आमदार शेळके यांनी दिली.
या कामामध्ये प्रदिप मेहता, जयपाल शहा, अशोक मेहरा, शेफाली शहा यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमप्रसंगी डॉ. सत्यजित वाढोकर, रामचंद्र सागर, शंकरराव सुपे व इतर मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ही आश्रमशाळा घेत असलेले कष्ट कौतुकास्पद आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– भाजपाचा विजयी सूर मावळमध्ये चमत्कार घडविणार? मावळ भाजपाला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत नवसंजिवनीची अपेक्षा
– महत्वाची बातमी ! सायकल स्पर्धेकरिता मावळमधील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
– मावळचा लेक बनला मुंबईचा नगरसेवक ! मावळातील पारिठेवाडी येथील मंगेश पांगारे मुंबई मनपा निवडणुकीत नगरसेवकपदी विजयी
– वडगावची लढाई आणि ऐतिहासिक तह.. मराठ्यांच्या इतिहासातील सोनेरी पान : पानिपतावरील पराभवाचा वचपा मराठ्यांनी मावळभूमीवर काढला
