मावळ तालुक्यात आदिवासी बहुल भाग असलेल्या माळेगाव खुर्द आणि परिसरातील नागरिकांसाठी 1 सप्टेंबर हा दिवस अत्यंत खास ठरला आहे. याचे कारण गेल्या अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर या भागातील नागरिकांची वेगळ्या पोस्ट ऑफिसची मागणू पूर्ण होऊन नवीन पोस्ट ऑफिसचं उद्घाटन देखील झाले आहे. माळेगांव खुर्द गावात शुक्रवारी, दिनांक 1 सप्टेंबर 2023 नवीन पोस्ट ऑफिस कार्यलयाचे उद्घाटन बी. पी. एरंडे साहेब – अधिक्षक, पुणे पोस्ट विभाग यांच्या हस्ते करण्यात आले. ( Inauguration of new post office at Malegaon Khurd In Maval Taluka )
ह्या पोस्ट ऑफिसमुळे कुणेवाडी, माळेगाव बुद्रुक, माळेगाव खुर्द, पिंपरी बुद्रुक, तळपेवाडी, सावळा आदी गावांतील विशेषतः आदिवासी बहुल असलेल्या या प्रदेशातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूर्वी या सर्व लोकांना पोस्टाच्या कामासाठी तब्बल 8 ते 10 किलोमीटरचे अंतर कापून इंगळून इथे जावे लागत. परंतू आता हाकेच्या अंतरावर पोस्ट ऑफिस असल्याने त्यांचा हा त्रास वाचणार आहे.
शुक्रवारी पोस्ट ऑफिसच्या उद्घाटनावेळी; बी. पी. एरंडे साहेब (अधीक्षक – पुणे पोस्ट विभाग), गणेश वरुळकर(सहाय्यक अधीक्षक) उगलेसर, दत्ता भोईरकर (पोस्टमन), साधना काठे (सरपंच – ग्रामपंचायत माळेगांव बुद्रुक), शंकर बोऱ्हाडे (माजी उपसरपंच), बाळासाहेब खंडागळे (आदर्श सरपंच), प्रमिला भालके (मुख्याध्यापिका – सेवाधाम आश्रम शाळा), दशरथ दगडे (मा सदस्य), देशमाने भाऊसाहेब, बाळासाहेब घाडगे (अध्यक्ष SRP मावळ), रामदास काठे, भालके सर, यमाजी बोऱ्हाडे यांसह ग्रामस्थ, शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Inauguration of new post office at Malegaon Khurd In Maval Taluka )
“ग्रामीण भागातील लोकांचे टपाल वेळेत मिळावे, पोस्ट कार्यालयातील सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता इथे पोस्ट कार्यालय सुरु करण्यात आले आहे. नागरिकांना या पोस्ट कार्यालयाच्या माध्यमातून अपघात पॉलिसी, मासिक बचत खाते, चालू बचत खाते, सुकन्या समृद्धी योजना, मासिक डिपॉझिट, किसान विकास पत्र, 399 किंवा 299 रुपयांत भारतीय डाक अपघात विमा आदी सुविधा प्रदान करण्याचा मानस आहे. तसेच आपल्या गावातच नवीन पोस्ट कार्यालय झाल्यामुळे नागरिकांची पायपीट थांबेल.” – अधीक्षक – पुणे पोस्ट विभाग
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– वैकुंठवासी मृदंगमणी दत्तोबा महाराज शेटे यांचे पुण्यस्मरण आणि गुरुपौर्णिमा निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान
– अजित पवारांकडून ‘एक देश, एक निवडणूक’ पॉलिसीचं समर्थन; म्हणाले ‘पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात…’
– तळेगाव दाभाडे वाहतूक विभागाच्या छतावर चढून मनोरुग्णाचा धुडगूस – व्हिडिओ