पुणे जिल्हा परिषद,पंचायत समिती मावळ, तालुका मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ व मावळ तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन कामशेत येथील सुमन रमेश तुलसानी टेक्निकल कॅम्पसमध्ये भरविण्यात आले आहे. गुरुवारी (दि. 18) मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, शिक्षण उपसंचालक राजेंद्र आहिरे, माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, माध्यमिक शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांंच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
गुरूवार दिनांक 18 जानेवारी ते 20 जानेवारी पर्यंत हे विज्ञान प्रदर्शन असणार असून पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविलेला प्रकल्प प्रदर्शनात सादर करण्यात आले आहे. यावर्षी प्रथमच दिव्यांग व आदिवासी गटातून प्रकल्प सादर करण्यात आले आहेत. प्रदर्शनात पुणे जिल्ह्यातील 240 शाळेतील 350 विद्यार्थी व 48 परिचर आणि विज्ञान शिक्षकांनी 180 प्रकल्प सादर केलेत. ( Inauguration of Pune District Level Science Exhibition at Kamshet Maval Taluka )
यावेळी उपशिक्षणाधिकरी अनंत दाणी, छाया महिंद्रकर, निलेश धानापुणे, प्रणिता कुमावत, गटशिक्षणाधिकारी मावळ सुदाम वाळुंज,शिक्षण विस्तार अधिकारी शोभा वाहिले,पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष नंदकुमार सागर, उपाध्यक्ष राजेश गायकवाड, विस्तार अधिकारी सुधीर चटणे, तुलसानी काॕलेज प्राचार्या श्रध्दा चव्हाण, तालुका अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे, जिल्हा अध्यक्ष रोहिदास एकाड, तालुका अध्यक्ष सुरेश सुतार, अभिमन्यु शिंदे यांंच्यासह जिल्ह्यातील शिक्षक विद्यार्थी उपस्थीत होते.
तसेच यावेळी जिल्हा गुणवत्ता स्तर निश्चिती प्राप्त करणाऱ्या जिल्ह्यातील 34 शाळांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे व विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन सर्व केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती पं. स मावळ, मुख्याध्यापक संघ, विज्ञान व गणित संघ यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक सुत्रसंचालन मुकुंद तनपुरे,ज्योती लावरे तर आभार गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी मानले.
पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी कमलाकांत म्हेत्रे व मावळ गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी मावळ तालुक्यासह जिल्ह्यातील विज्ञान प्रेमी विद्यार्थांंनी,शिक्षकानी तसेच पालकांनी या विज्ञान प्रदर्शनाला उपस्थीत राहावे व प्रकल्प पाहण्यासाठी यावे, असे आहवान केले.
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, महामार्गावर 6 तासांचा ब्लॉक, लगेच वाचा । Mumbai Pune Expressway
– मावळमधील कान्हे गावात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत महाशिबिराचे उद्घाटन । Maval News
– नानोली तर्फे चाकण इथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न; दत्तात्रय पडवळ यांच्यामार्फत सर्व विजयी स्पर्धकांना टीशर्ट वाटप