पवना धरण परिसरामध्ये दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिमुसळधार पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याकरिता आज, रविवारी दोनवेळा विसर्ग वाढविण्यात आला.सध्या धरणातून 8960 क्युसेक इतका विसर्ग होत आहे. धरणातून विसर्ग वाढविल्यामुळे पवना नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पवना नदी दुथडी भरून वाहू लागल्याने पवनानगरच्या पुढील कोथूर्णे गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या गावचा पवनानगर बाजारपेठेशी असणारा थेट संपर्क तुटला आहे. आता येथील नागरिकांना शिवली ते ब्राम्हणोली असा वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे.
सध्या पवना नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कुणीही नदीच्या पाण्यात जाऊ नये, पुलावरून पाणी जात असल्यास आपले त्यावरून चालवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– लोणावळेकरांनो काळजी घ्या, पावसाचा जोर वाढलाय, यंदाच्या मोसमात 4000 मिलिमीटर पाऊस पूर्ण, वाचा अधिक । Lonavala Rain Updates
– मावळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जोरदार इन्कमिंग, ग्रामीण भागातील अनेकांचा पक्षप्रवेश, शरद पवारांची घेतली भेट
– मोठी बातमी ! पावसाचा जोर प्रचंड वाढला, पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला, पवना नदीपात्रात 7070 क्युसेक विसर्ग सुरू । Pavana Dam News