मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या जागेत बांधकाम होत असून ते त्वरित थांबवून सदर बाबीची चौकशी करावी, अशी लक्षवेधी आमदार सुनिल शेळके यांनी विधानसभेत मांडली. ज्यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उत्तर दिले. ( Indrayani Vidya Mandir Talegaon Dabhade illegal construction case MLA Sunil Shelke in Vidhan Sabha )
प्रकरण – 1970 साली इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेला राज्य सरकारकडून 15 एकर जागा मोफत देण्यात आली होती. ही संस्था सुरळीत सुरू असताना मागील काही वर्षांपासून माजी विद्यार्थी आणि सध्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संस्थेच्या मनमानी कारभारासंदर्भात अनेक तक्रारी येत आहेत. तसेच संस्थेच्या क्रीडांगणाच्या जागेत बेकायदेशीर बांधकाम सुरु आहे. शासनाने समिती गठित करून या संस्थेची चौकशी करावी आणि सध्याचे हे बांधकाम त्वरित थांबवावे, अशी विनंती लक्षवेधीद्वारे आमदार सुनिल शेळके यांनी विधानसभेत केली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– राहुल गांधींना ‘सर्वोच्च’ दिलासा! पावसाळी अधिवेशनाला हजेरी लावणार, 2024ची निवडणूकही लढवणार.. पाहा कोर्टाने काय म्हटलंय?
– पुण्यात तलवारीने दहशत निर्माण करून पसार झालेल्या आरोपीला तुंग किल्ला परिसरातून अटक
– औरंगाबादमधून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीची कामशेत पोलिसांकडून चिखलसे गावाजवळ सुटका; अट्टल आरोपी अटकेत