Dainik Maval News : मावळ तालुका हा भात पिकाचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु यंदा मावळात भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. तालुक्यात सर्वदूर भात पिकावर करपा रोग पडलेला दिसत असून यामुळे उत्पादन घटनाच्या चिंतेने शेतकरी हैराण झालेत. तर, कृषी विभागाने आता शास्त्रज्ञांच्या जोडीने तालुक्यात गावोगावी दौरे करून मार्गदर्शन करायला सुरुवात केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वातावरणीय बदलानुसार मावळ तालुक्यातील काही भागात भात पिकावर करपा, कडा करपा आणि शेंडे करपा रोगाची लागण होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी भात पिकावरील कीड रोगाचे व्यवस्थापन करावे व त्याप्रमाणे प्रतिबंधक उपाययोजना करावी, असे आवाहन मावळ तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी केले आहे.
कृषी अधिकारी आणि शास्त्रांचा पाहणी दौरा –
तालुक्यात यावर्षी चांगल्या पावसामुळे भात पीक अतिशय जोमदार आले आहे. परंतु वातावरणातील बदलानुसार भातावर रोगराई येण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्याने काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे, कीड रोग तज्ञ डॉ. किरण रघुवंशी आणि मावळ तालुक्यातील भात संशोधन केंद्राचे कृषी अधिकारी यांच्या समावेत मावळ तालुक्याच्या विविध भागात जाऊन शेतकऱ्यांसह भात पिकाची पाहणी केली.
खरीप भात पिकावर येणारे संभाव्य रोग करपा, कडा करपा, शेंडे करपा या रोगाविषयी माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. रोगाची त्याची लक्षणे शेतकऱ्यांना समजावून सांगितली. त्यावर कोणकोणती उपाययोजना केली पाहिजे याबाबतही तज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. वातावरणातील बदलानुसार भात पिकावरील कीडरोग व्यवस्थापन शेतकऱ्यांनी करावं, तसेच शेतकऱ्यांनी संभाव्य भविष्यातील रोग प्रतिबंधक औषध फवारणी ही करावी, असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले.
अधिक वाचा –
– द्रुतगती मार्गावरील नवीन बोगद्यात एसटी बसचा अपघात, 6 जण जखमी । Lonavala News
– शिवसेनेच्या आमदार आणि भाजपाच्या खासदाराविरोधात मावळ तालुका काँग्रेसचे आंदोलन ; गुन्हे दाखल करून अटकेची मागणी
– केंद्राच्या ‘एक देश – एक निवडणूक’ निर्णयाचे स्वागत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे