राज्यात आजही अनेक जिल्हा परिषद शाळांची अवस्था ठिक नसल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयी आणि असुविधांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे विद्यार्थी संख्या रोडावते. कष्टकरी समाजातील विद्यार्थ्यांना पैशाअभावी खाजगी शाळेत प्रवेश घेता येत नाही. अशीच 80 पटसंख्या असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी सोमाटणे मध्ये इयत्ता पहिली ते चौथीची मुले इथे शिक्षण घेतात. ( Inner Wheel Club of Talegaon Dabhade adopted Zilla Parishad School Vitthalwadi Somatne )
मोल मजुरी करणाऱ्या पालकांची ही मुले आहेत. मुलांच्या अंगात ताप असला तरी पालक त्यांना शाळेत सोडून कामावर जातात अशी अवस्था आहे. त्यांच्यासाठी साध्या वह्या, कंपास बॉक्स, दप्तरे घेणेही पालकांना शक्य होत नाही. त्यामुळे इनर व्हील क्लब ऑफ तळेगांव दाभाडे च्या अध्यक्षा संध्या थोरात यांनी मावळातील अनेक शाळांचा सर्व्हे करून या शाळेला दत्तक घेऊन हॅप्पी स्कूल प्रोजेक्टसाठी निवडले.
गेले तीन ते चार महिने या शाळेवर काम चालू होते. असंख्य देणगीदारांच्या मदतीने शाळेत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या. विद्यार्थ्यांना प्यायला शुद्ध पाणी मिळावे म्हणून वॉटर प्युरिफायर, लायब्ररीसाठी लाकडी कपाट, मुलांना बसायला बेंचेस तसेच शालोपायोगी साहित्य, वह्या, कंपास बॉक्स, स्कूल बॅग्ज, खेळाचे साहित्य, ई लर्निंग कीट इत्यादी साहित्य भेट दिले. यासाठी एकूण 82 हजार खर्च आला. मुलांच्या आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप काही देऊन गेला.
अनेक दानशूर हात यासाठी पुढे आले. मालपाणी परिवार चॅरिटेबल ट्रस्ट, सचिन मुऱ्हे, विनायक आगळे, सारिका भेगडे, अर्चना देशमुख, डॉ. दीपाली झंवर, मंगल पवार, ममता मराठे, मंजुश्री जुडे, डॉ लीना कवितके, इंद्राणी दास, अभिषेक तिवारी, बसनगोंड कडोली यांनी खारीचा वाटा उचलला आणि शाळेतील विद्यार्थ्यांना आनंदी केले.
या सर्व गरजा पूर्ण केल्यावर शाळेच्या भिंतीवर हॅप्पी स्कूलचा बोर्ड लावण्यात आला. त्याच्या अनावरणासाठी शाळेतील विद्यार्थी, सर्व शिक्षिका उपस्थित होत्या. इनर व्हील क्लब तळेगांव दाभाडेच्या अध्यक्षा संध्या थोरात, सचिव निशा पवार, एडिटर आरती भोसले यांनी बोर्डचे अनावरण केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– इंदोरीतील चैतन्य इंटरनॅशनल स्कूल संस्थेला देशातील ख्यातनाम संस्थेकडून पुस्कार
– जनरल मोटर्सच्या कामगारांबाबत ‘वर्षा’वर बैठक संपन्न; मुख्यमंत्री शिंदेंचा कामगारांना शब्द, मंत्री सामंत गुरुवारी उपोषणस्थळी येणार
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । ‘आईच्या मायेने वंचित लेकरांना ती घडवतेय…’ समाजसेविका गौरी सोनवणे यांची प्रेरणादायी वाटचाल