Dainik Maval News : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन तर्फे बेवारस पडलेली वाहने कागदपत्रे दाखवून पंधरा दिवसाच्या आत घेऊन जावीत, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नवार यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
त्यामध्ये वर्षानुवर्षे बेवारस पडून असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहन मालकांनी आपली वाहनांची कागदपत्रे दाखवून, ओळख पटवून, वडगाव मावळ कोर्ट यांच्या कडून आदेश प्राप्त करून संबंधितांनी पुढील पंधरा दिवसाच्या आत ताब्यात घ्यावी. अन्यथा सदर वाहनांना बेवारस म्हणून जाहीर करून कायदेशीर लीलाव करून रक्कम शासनास भरण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायान्नावार यांनी स्पष्ट केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– बापूसाहेब भेगडे यांच्या सदिच्छा भेटीत तरुण कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक व महिलांचा मोठा प्रतिसाद । Bapu Bhegade
– निवडून आल्यास कुणाला पाठींबा देणार? बापूसाहेब भेगडे यांना समर्थन देणाऱ्या महाविकासआघाडीतील नेत्यांमध्ये संभ्रम
– आमदार सुनिल शेळके यांच्या ‘रेकॉर्ड ब्रेक’ विजयासाठी महायुतीचा नियोजनबद्ध प्रचारावर भर । Sunil Shelke