Dainik Maval News : देहू नगरपंचायतीच्या पाणीपट्टी व मिळकत कर वसुलीसाठी आलेल्या पथकाला शिवीगाळ करीत शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना मंगळवारी (दि.18) सायंकाळी घडली. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
देहू नगरपंचायतीने मिळकत कर व पाणी आकार वसुलीसाठी दवंडी पिटवत व अन्य मार्गांनी जागृती करीत नागरिकांना कर भरण्याचे आवाहन केले होते. त्याअनुषंगाने मंगळवारी थकीत मिळकत कर वसुलीसाठी नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी विविध विभागात वसुली करत होते. यादरम्यान कर न भरणाऱ्या सुमारे ३५ थकबाकीदारांचे नळजोड तोडण्यात आले.
दरम्यान, कर वसुली पथक शासकीय गायरान जागेवरील ठिकाणी आले असता, तिथे थकीत कर न भरल्याने नळजोड तोडताना बालाजी झोंबाडे यांनी हस्तक्षेप करीत गर्दी जमवली व अन्य दोन महिलांसह सरकारी कामात अडथळा आणला. तसेच शिवीगाळ करीत सरकारी पाणीपट्टी, घरपट्टी भरण्यास नकार दिला असे, फिर्यादीत नमुद आहे. याप्रकरणी महिला कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरील झोंबाडे व दोन महिला यांच्या विरोधात देहूरोड पोलिसांत अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मोर्चेबांधणी ; 22 मार्चला सर्व उमेदवारांची बैठक
– पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणावर आमदार सुनिल शेळकेंनी विधानसभेत उठवला आवाज ; मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या…
– मावळ मतदारसंघातील रेल्वेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी येत्या आठ दिवसांत बैठक ; केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची ग्वाही । Maval Lok Sabha

