व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मंगरूळमध्ये अवैध वृक्षतोड आणि उत्खनन ; दोषींवर कारवाईसाठी आमदार शेळकेंची विधानसभेत लक्षवेधी । MLA Sunil Shelke

विभागीय आयुक्तांमार्फत एका महिन्यात सखोल चौकशी अहवाल सादर करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 22, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, व्हिडिओ, शहर
MLA Sunil Shelke Minister Chandrashekhar Bawankule

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील मंगरूळ येथे मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड आणि गौण खनिजांचे उत्खनन झाल्याचे उघड झाले आहे. वनक्षेत्र म्हणून राखीव असलेल्या गट क्रमांक ४१ ते ४९ मध्ये सुमारे ८०० ते ९०० झाडे तोडली गेली असून, ४० ते ४५ हजार ब्रास माती, मुरूम आणि डबर यांचे उत्खनन करण्यात आले आहे. पर्यावरणाची झालेली हानी व अधिकाऱ्यांची दुर्लक्षीत भूमिका यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या प्रकरणी आमदार सुनिल शेळके यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत, संबंधित अधिकारी आणि जमीनमालकांवर कारवाईची मागणी केली.

पर्यावरण प्रेमी व ग्रामस्थांनी या वृक्षतोडीबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या. डिसेंबर २०२४ मध्ये या वृक्षतोडीचा आणि उत्खननाचा प्रकार उघडकीस आला. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. विशेष म्हणजे, गट क्रमांक ४२ आणि ४६ हे वनक्षेत्रात समाविष्ट असूनही, उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्याठिकाणी परवानगी दिली. या परवानगीचा गैरफायदा घेत सुमारे ३ लाख ६१ हजार ब्रास उत्खनन केल्याचे दिसून आले.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे उत्तर
या प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत उत्तर देताना सांगितले की, गट क्रमांक ३५, ३६, ३७, ३८, ४१, ४२ आणि ४६ या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले आहे. त्यापैकी ३५, ३६, ३७ आणि ३८ हे खाजगी गट असून, त्यांना दहा वर्षांचा खाणपट्टा मंजूर करण्यात आला आहे. तथापि, ४१, ४२ आणि ४६ हे वनक्षेत्र राखीव असल्याने तिथे कोणत्याही प्रकारचे उत्खनन किंवा वृक्षतोड होऊ नये. मात्र, या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर उत्खनन झाले आहे.

मंत्री बावनकुळे यांनी याप्रकरणी विभागीय आयुक्त चौकशीचे आदेश दिले असून, एका महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी परवानगी चुकीच्या पद्धतीने दिली आहे का, याची सखोल तपासणी केली जाणार आहे. तसेच, वनक्षेत्रामध्ये अवैध उत्खनन आणि वृक्षतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. शासन स्वतःच्या यंत्रणेमार्फत सर्वेक्षण करून दोषींवर गुन्हे दाखल करणार आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी‌‌ मोर्चेबांधणी ; 22 मार्चला सर्व उमेदवारांची बैठक
– पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणावर आमदार सुनिल शेळकेंनी विधानसभेत उठवला आवाज ; मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या…
– मावळ मतदारसंघातील रेल्वेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी येत्या आठ दिवसांत बैठक ; केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची ग्वाही । Maval Lok Sabha


dainik maval jahirat

Previous Post

Mazi Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 रुपये हफ्ता कधी मिळणार ? अर्थमंत्री अजित पवारांनी स्पष्ट सांगितले…

Next Post

कर वसुलीसाठी गेलेल्या महिला अधिकाऱ्यांना शिवीगाळ ; देहू नगरपंचायत हद्दीतील गंभीर प्रकार । Dehu Nagar Panchayat

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Dehu Nagar Panchayat

कर वसुलीसाठी गेलेल्या महिला अधिकाऱ्यांना शिवीगाळ ; देहू नगरपंचायत हद्दीतील गंभीर प्रकार । Dehu Nagar Panchayat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.