व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आंतरजिल्हा गांजा तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त, 96 किलो गांजासह 63 लाखांचा मुद्देमाल जप्त, मावळमधील एकाला अटक । Pune News

आंतरजिल्हा गांजा तस्करी करणारे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला यश आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 25, 2025
in पुणे, ग्रामीण, शहर
Inter-district ganja smuggling racket busted 96 kg ganja worth Rs 63 lakh seized Chakan Pune Police

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आंतरजिल्हा गांजा तस्करी करणारे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला यश आले आहे. ९६ किलो गांजा आणि २ चारचाकी वाहनांसह ६३ लाख ३१ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर रोहकल फाटा (ता. खेड) येथे शुक्रवारी (दि.२१) दुपारी बाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

चाकण पोलिस ठाण्यात याबाबत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संजय पांडुरंग मोहिते (वय ३९, रा. गोवित्री, ता. मावळ, जि. पुणे) मन्साराम नुरजी धानका (वय ४०, रा. हुरेपाणी, ता. शिरपूर, जि. धुळे) तसेच एक महिला आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी ६३ लाख ३१ हजार २०० रुपये किमतीचा गांजा व अन्य मुद्देमाल जप्त केला. ९६ किलो २०४ ग्रॅम गांजा, ३ मोबाईल, २ चारचाकी वाहने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

  • सहायक पोलिस निरीक्षक विक्रम गायकवाड अणि पथक हे चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्या वेळी पोलिस अधिकारी विक्रम गायकवाड आणि पोलिस अंमलदार निखिल वर्षे यांना माहिती मिळाली होती की, सिल्व्हर रंगाची टोयाटो इनोव्हा आणि पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी इको या दोन वाहनांमध्ये गांजा असल्याचे आढळले होते. तसेच, ही वाहने चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रोहकल फाटा येथून जाणार असल्याची माहिती मिळाली होती.

त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांना कळविली. त्यांनी तत्काळ २ पथके तयार करून संबंधित वाहनांचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार, रोहकल फाटा येथे नाकाबंदी केली. या नाकाबंदीदरम्यान दोन चारचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली. संबंधित वाहनांमध्ये पाहणी केली असता एकूण ६ गांजा असलेली पोती आढळून आली.

  • पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपआयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे १) विशाल हिरे, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे २) बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.

पथकामध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलिस अंमलदार प्रदीप शेलार, किशोर परदेशी, मयूर वाडकर, शिल्पा कांबळे, निखिल शेटे, निखिल वर्षे, कपिलेश इगवे, मितेश यादव, चिंतामण सुपे, सुनिल भागवत, महादेव बिक्कड तांत्रिक विश्लेषण विभागाचे प्रकाश ननावरे तसेच यांच्या पथकाने केली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा


Previous Post

प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यातील तीर्थ कुंभ कलशाचे टाकवे गावात उत्साहात स्वागत । Maval News

Next Post

तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे ‘कचरामुक्त शहर’ अभियान । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Waste Free City campaign of Talegaon Dabhade Nagar Parishad

तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे 'कचरामुक्त शहर' अभियान । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Sunetra Ajit Pawar should become Chief Minister of Maharashtra said MLA Sunil Shelke

‘सुनेत्रा वहिनींनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं…’ – आमदार सुनील शेळके

April 1, 2026
Statement to CEO to take immediate measures regarding increasing traffic congestion on market road in Vadgaon Maval

वडगावमधील मुख्य बाजारपेठ मार्गावर वाढत्या वाहतूक कोंडीबाबत तातडीने उपाययोजना करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

April 1, 2026
Fort conservation campaign on Lohgad Fort through Aapla Mavla organization on the initiative of MP Nilesh Lanke

Lohgad Fort : खासदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून ‘आपला मावळा’ संघटनेमार्फत किल्ले लोहगडावर गडसंवर्धन मोहीम

April 1, 2026
My Village Healthy Village campaign to start in maharashtra Healthy villages will get the title of Healthy Village

राज्यात आजपासून ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला प्रारंभ ; सुदृढ गावांना मिळणार ‘आरोग्यसंपन्न गाव’ किताब

April 1, 2026
LPG-Gas

नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच गॅस महागला ; व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १९५ रुपयांनी वाढली

April 1, 2026
Talegaon Dabhade police negligence exposed incident of not taking proper notice of missing CRPF jawan

सीआरपीएफ जवानाच्या मिसिंग प्रकरणात तळेगाव दाभाडे पोलिसांचा हलगर्जीपणा समोर ; रस्ते अपघातानंतर…

March 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.