Dainik Maval News : जॅपनीज इन्सेफलायटीस (जेई) प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार करण्यात आला असून मावळ तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्रे, शासकीय व खासगी शाळा अंतर्गत एक वर्ष ते १५ वर्षे वयोगटातील बालकांना हे लसीकरण करण्यात येत आहे. कार्ला परिसरातील शाळांमधील ३१५२ विद्यार्थ्यांना कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मुलांचे लसीकरण केले आहे. ( Japanese encephalitis vaccine )
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ. राधाकिसन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन देसाई, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शॅरन सोनवणे, गटशिक्षण अधिकारी सुदाम वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरु आहे. सरपंच दिपाली हुलावळे, मुख्याध्यापक संजय वंजारे, लक्ष्मीकांत घोंगडे यांच्या हस्ते एकविरा विद्यालयात लसीकरण मोहिमेचे उदघाटन करण्यात आले.
जॅपनीज इन्सेफलायटीस –
जॅपनीज इन्सेफलायटीस (जेई) हा आजार १५ वर्षांखालील बालकांमध्ये आढळून येतो. या आजारात सुमारे ७० टक्के रुग्ण मृत्यूमुखी पडतात किंवा त्या रुग्णामध्ये दीर्घकालीन न्यूरोलॉजिकल अक्षमता आढळून येतात. या आजारावर दीर्घकाळ नियंत्रण घालण्यासाठी जेइ लसीकरण हा एकमेव पर्याय आहे.
- जेईची लागण आणि लक्षणे
1. संक्रमित कुलेक्स डासांच्या चावण्यामुळे लागण
2. खूप ताप येणे, डोकेदुखी, हातपाय आकडणे
3. उदासीनता, बेशुद्ध होणे, अर्धांगवायू, आकडी येणे
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मिसिंग लिंक झाला, आता मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आठ पदरी करण्याचा प्लॅन ; एमएसआरडीसीकडून सरकारला प्रस्ताव । Mumbai Pune Expressway
– शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! पुणे जिल्ह्यातील 146 किमी पाणंद रस्ते मोकळे, मावळमधील 23.8 किमी पाणंद रस्ते मोकळे
– कामाची बातमी : भूमिअभिलेख विभागाकडून गाव नकाशा ऑनलाईन उपलब्ध, असा चेक करा तुमच्या गावचा नकाशा